नुपूर पाटील, प्रतिनिधी
मुंबई, 30 मार्च : चहा प्यायला अनेकांना आवडतं. चहाप्रेमी मंडळींची मोठी संख्या असल्यानं प्रत्येक शहरात जागोजागी चहाच्या टपऱ्या आढळतात. त्या टपरीवर चहाचे वेगवेगळे प्रकार मिळतात. गेल्या काही वर्षात चहा उद्योगालाही संघटित रुप प्राप्त झालं आहे. पण, चहा पिण्याबरोबरोबच तो खाताही येतो असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर? तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, मुंबईतील शिवाजी पार्क भागात या प्रकारचा भन्नाट चहा मिळतोय.
काय आहे प्रकार?
आशुतोष चौधरी या तरुणाने इंजिनिअरिंगच जॉब सोडून 'स्वादिष्टम चहा' हा व्यवसाय सुरू केलाय. त्यावेळी चहा दिला जाणाऱ्या प्लॅस्टिक कपमुळे कचरा होतो, असं त्याच्या लक्षात आलं. या कचऱ्यावर उपाय म्हणून त्यानं बिस्किटचे कप तयार केले. सुरुवातीला हे कप पातळ असल्यानं विरघळले. त्यानंतर त्याने त्यामध्ये सुधारणा केली. आता या कपात 15 मिनिटं चहा ठेवला तरी तो तसाच राहतो.
कोल्हापूरचा बासुंदी चहा एकदा पिऊन तर पहा! रात्री देखील असते मोठी गर्दी, Video
'हा कप अनेक प्रकारचे धान्य वापरुन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तो पौष्टिक आहे. चहा पिल्यानंतर तो कप खाता येतो. खायचा नसेल तर डिस्पोजही करता येतो. त्याचबरोबर कुत्रीही आवडीनं हा कप खातात,' असं आशुतोषनं सांगितलं.
कोणते फ्लेवर मिळतात?
आशुतोषनं हा खास कप कप वेगवेगळे धान्य एकत्र करून बनवण्यात आला आहे त्यामुळे त्याची चव खुप वेगळी आहे. त्याचबरोबर व्हॅनिला, चॉकलेट, वेलची या विविध फ्लेवर्समध्ये हा कप मिळतो. यामध्ये चहा, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी हे पदार्थ मिळतात. हे नवं कॉम्बिनेशन ट्राय करण्यासाठी अनेक जणं शिवाजी पार्कमध्ये येतात. विशेषत: तरुणांमध्ये याची जास्त क्रेझ आहे. या कपांची आता इतर राज्यांमध्येही विक्री होत आहे.
काय आहे किंमत?
झिरो वेस्ट प्रोडक्ट असलेल्या या चहाची किंमत 15 रुपये आहे. या कपच्या फ्लेवरनुसार वेगवेगळ्या किमती आहेत. विशेष म्हणजे हा चहा आशुतोषचे बाबा तयार करतात. त्यामुळे या चहाला 'पापा मेड टी' म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा चहा फक्त शनिवार आणि रविवारीच शिवाजी पार्क येथील जिम बाहेर मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Local Food, Local18, Mumbai, Tea