मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रखवालदार ते IIM मध्ये प्रोफेसर; जाणून घ्या सोशल मीडिया गाजवलेल्या रणजीत आर यांची प्रेरणादायी कथा

रखवालदार ते IIM मध्ये प्रोफेसर; जाणून घ्या सोशल मीडिया गाजवलेल्या रणजीत आर यांची प्रेरणादायी कथा

अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेले रणजीत हे रखवालदार (Guard) म्हणून काम करत होत. आता ते आयआयएममध्ये (IIM) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) झाले आहेत.

अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेले रणजीत हे रखवालदार (Guard) म्हणून काम करत होत. आता ते आयआयएममध्ये (IIM) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) झाले आहेत.

अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेले रणजीत हे रखवालदार (Guard) म्हणून काम करत होत. आता ते आयआयएममध्ये (IIM) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) झाले आहेत.

तिरुवनंतपुरम 12 एप्रिल : प्रबळ इच्छाशक्ती (Willpower) असेल तर माणूस काहीही करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण कासारगोड जिल्ह्यातील 28 वर्षीय रणजीत आर (Ranjith R)यांनी सर्वांसमोर ठेवलं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेले रणजीत हे रखवालदार (Guard) म्हणून काम करत असताना आयआयएममध्ये (IIM) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) झाले आहेत. मद्रास आयआयटीमधून अर्थशास्त्रातील (Economics) डॉक्टरेट प्राप्त केलेल्या रणजीत यांची ही वाटचाल अतिशय प्रेरणादायी असून सध्या सोशल मीडियावर त्यांची कहाणी गाजते आहे.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं रणजीत यांनी गेल्या वर्षी पीएचडी मिळाल्यानंतरन आपली कथा फेसबुकवर मांडली होती. त्यात त्यांच्या बिन गिलाव्याच्या भिंती आणि दारदेखील नसलेल्या दोन खोल्यांच्या घराचे फोटो टाकले आहेत. या फेसबुक पोस्टला तेव्हा 37 हजार लाइक मिळाले होते. ते बघून नेटीझन्स त्यांच्या विजिगीषू वृत्तीनं भारावून गेले असून सर्वसामान्य लोकच नव्हे; तर केरळचे अर्थमंत्री टी. एम. थॉमस इसाक (Finance Minister T.M.ThomasIssac) यांनीही रणजीत यांचे कौतुक केलं आहे. ‘असामान्य इच्छाशक्ती’ अशा शब्दात त्यांनी रणजीत यांची प्रशंसा केली आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास परिस्थिती असूनही शिक्षणाची ओढ आणि त्यासाठी कष्ट घेण्याची रणजीत यांची वृत्ती बघून माजी राष्ट्रपती दिवंगत के. आर. नारायणन (Former President K.R.Narayanan) यांची आठवण होते असं इसाक यांनी म्हटलं आहे.

रणजीत यांची धाकटी बहिण रंजिता के. आर. (24) हिनंही अर्थशास्त्रात पदव्यूत्तर पदवी घेतली असून बी.एडदेखील केलं आहे. तिनं आपल्याला आपल्या भावामुळेच शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाल्याचं म्हटलं आहे.‘रणजीत माझं प्रेरणास्थान असून मी त्याच्या पावलावर पाऊल टाकणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. आमच्या घरात तोच सर्वात जास्त शिकलेला असून त्याच्यानंतर मी असेन असंही रंजिता हिनं आवर्जून नमूद केलं आहे.

अखेर 10 वी आणि 12 च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, नवं वेळापत्रक होणार जाहीर

रणजीत यांचा जन्म अनुसूचित जाती जमातीतील असलेल्या जेमतेम पाचवीपर्यंत शिकलेल्या आई-वडिलांच्या पोटी झाला. त्यांचे वडील रामचंद्रन नाईक हे शिलाईकाम करतात. हे कुटुंब मूळचं मराठी असून अनेक वर्षांपूर्वी केरळात स्थायिक झालं. बेबी या पनाथूर इथल्या केलापनकायम गावात चालणाऱ्या ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरी करतात. अल्पशिक्षित असले तरी रणजीत यांच्या आई-वडीलांना शिक्षणाचे महत्त्व माहित असल्यानं त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे आवर्जून लक्ष दिलं. रणजीत यांना त्यांनी पिलीकोड पंचायतीच्या वेलाचल इथं आदिवासी मुलांसाठी (Tribal Children) चालवण्यात येणाऱ्या सरकारी मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल(MRS) या निवासी शाळेत घातले. दहावीपर्यंत रणजीत यांनी या शाळेत शिक्षण घेतलं.

‘शिक्षणाचा खर्च सरकारकडूनच केला जात होता, त्यामुळं घरच्या आर्थिक परिस्थितीबाबत मी अनभिज्ञच होतो, असं वडिलांनी दी न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. दहावीनंतर उच्च माध्यमिक शिक्षणसाठी त्यांनी बालानथोडे इथल्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला. इथं त्यांना अर्थशास्त्र या विषयाची गोडी लागली. शालेय शिक्षणानंतर राजापुरम इथल्या सेंट पायस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून अर्थशास्त्रात बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यावेळी त्यांना घरची परिस्थती कठीण होत चालल्याची जाणीव झाली. घरात आपणही मदत केली पाहिजे यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्याचवेळी त्यांनी एक नोकरीची जाहिरात बघितली. पनाथूर इथल्या बीएसएनएल एक्स्चेंजला(BSNL Exchange) रखवालदाराची (Guard)गरज होती. रणजीत यांनी या नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यांना ती मिळालीदेखील. त्यांना साडेतीन हजार रुपये पगार होता. पदवीची तीन आणि पदव्यूत्तर पदवीची दोन अशी पाच वर्षे त्यांनी ही नोकरी करत आपला अभ्यास केला. पाचव्या वर्षी त्यांना आठ हजार रुपये पगार मिळत होता. पदव्यूत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षी ते कॉलेजात प्रथम आले.

केरळ विद्यापीठातून पदव्यूत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी मद्रासमध्ये पी.एचडीसाठी प्रवेश घेतला. आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपणच एकटे मध्यमवर्गीय घरातून आलो आहोत असं त्यांना वाटत असे. ‘मी बोलायलादेखील घाबरत असे,मद्रासला येण्याआधी मी फक्त मल्याळममध्ये बोलत असे’,असं रणजीत यांनी सांगितलं. या परिस्थितीमुळे एका वर्षातच त्यांनी पी.एचडी सोडण्याचा विचार केला;पण त्यांचे गाईड आणि विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. सुभाष शशीधरन यांनी एक आठवडा रोज रणजीत यांना जेवायला बाहेर नेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अशी हार मानण्याआधी एकदा शेवटचा लढा देण्यासाठी तयार केलं. ‘तेव्हांपासून मी स्वतःला लढण्यासाठी सज्ज केलं. सुभाष सरांचे अनेक विद्यार्थी मोठ्मोठ्या संस्थांमध्ये काम करत आहेत. मी सुद्धा त्यांच्यासारखे होण्याचा निश्चय केला,’असं रणजीत यांनी सागितलं.

मग रणजीत यांनी मागं वळून पाहिलं नाही. अवघ्या चार वर्ष आणि तीन महिन्यात त्यांचे तीन शोधनिबंध प्रसिद्ध झाले. आयआयटीनं त्यांना उरलेल्या नऊ महिन्यांसाठी प्री-डॉक्टरल संशोधनासाठी फेलोशिप(Fellowship)दिली. पीएचडी लवकर पूर्ण झाल्याबद्दल त्यांना आयआयटीनं हा इन्सेटीव्ह दिला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये रणजीत यांनी आयआयएम रांची(IIM Ranchi)इथल्या सहायक प्राध्यापकाच्या पोस्टसाठी अर्ज केला. तर डिसेंबरमध्ये बेंगळूरू इथल्या ख्राईस्ट विद्यापीठानं(Christ University)त्यांच्या अर्थशास्त्र विभागात नोकरी देऊ केली आणि ते तिथं कार्यरत होते. दरम्यान,‘मी घर बांधण्यासाठी कर्ज घेण्याकरता बँकेत अर्ज केला होता,पण ते मंजूर होण्यापूर्वी आयआयएम रांचीमध्ये सहायक प्राध्यापक पदावर नेमणूक झाल्याचे पत्र मिळाले,’ असं रणजीत यांनी सांगितलं.

अतिशय प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या रणजीत यांनी अफाट इच्छाशक्तीच्या बळावर आपलं स्वप्न पूर्ण केलं. त्यांची ही यशोगाथा परिस्थितीशी सामना करणाऱ्या असंख्य मुलांना प्रेरणा देणारी असून अनेक घरांमधून असे रणजीत तयार होतील,अशी आशा अनेक आई-वडिलांच्या मनात निर्माण झाली आहे.

First published:

Tags: Inspiring story, Success stories