जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! साधी जखम म्हणून दुर्लक्ष केलं महिलेच्या डोळ्यातून अचानक बाहेर आला कीडा

बापरे! साधी जखम म्हणून दुर्लक्ष केलं महिलेच्या डोळ्यातून अचानक बाहेर आला कीडा

बापरे! साधी जखम म्हणून दुर्लक्ष केलं महिलेच्या डोळ्यातून अचानक बाहेर आला कीडा

बऱ्याच कालावधीपासून कीडा महिलेच्या डोळ्यात राहत होता, तिला याची माहितीच नव्हती.

  • -MIN READ Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

लंडन, 04 ऑगस्ट : बऱ्याचदा आपल्या डोळ्यात जळजळ होते, डोळे दुखतात किंवा डोळ्यावर एखादा फोड, छोटीशी जखम दिसते. याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा साधं काहीतरी असेल असं समजून घरच्या घरीच उपाय करतो. पण सामान्य वाटणारी डोळ्याची ही समस्या किती भयंकर असू शकते, याचाच प्रत्यय एका महिलेला आला आहे. डोळ्यावरील जखमेला तिनेही साधं समजून दुर्लक्ष केलं पण त्याच डोळ्यातून अचानक एक कीडा बाहेर आला आणि तिला धक्काच बसला. यूकेच्या लिव्हरपूलमध्ये राहणारी लुईस जिच्या उजव्या डोळ्यात वेदना होत होत्या. काही दिवसांनी तिच्या डोळ्यावर जखमही झाली. एखादा कीडा चावला असावा त्यामुळे जखम झाली असावी असं तिला वाटलं, त्यामुळे तिने फार गांभीर्याने घेतलं नाही. पण हळूहळू जखम वाढत गेली आणि इतकी वाढली की लुइसचा डोळा सुजला. तिला तिचा डोळा बंदही करता येईना. शेवटी तिने रुग्णालयात धाव घेतली. तिने आपली तपासणी करून घेतली पण त्यावेळीही काहीच समजलं नाही. हे वाचा -  डार्क सर्कल, रिंकल्स ठिक आहे पण डोळ्यांभोवती अशा पिवळ्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका एके रात्री घरी असताना अचानक तिच्या डोळ्यात खूप वेदना होऊ लागल्या. तिला आपल्या डोळ्यातून काहीतरी बाहेर येत असल्याचं दिसलं. तिने नीट पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला. ज्या डोळ्यावरील जखमेला ती कीड्याने चावल्याचं समजत होती, त्या जखमेत खरंतर कीडाच होता. त्याचे पायही तिला दिसले. हा कीडा तिच्या डोळ्यातून बाहेर आला.  लुइसच्या मते, आपल्या डोळ्यातकोणी एलियन आहे आणि कीडा शरीरातून बाहेर येत आहे, असंच त्यावेळी वाटल्याचं ती म्हणाली. तिने तात्काळ रुग्णालयात गेली. कीडा तिच्या डोळ्यातून बाहेर काढण्यात आला आणि तिच्या जखमेवर उपचार करण्यात आले. हळूहळू तिची जखम बरी होते आहे. आपण बऱ्याच कालावधीपासून कुठे बाहेर गेलो नाही. त्यामुळे झोपेत हा कीडा डोळ्यात गेला असावा, असा अंदाज तिने व्यक्त केला आहे. हे वाचा -  मानेवर दिसणाऱ्या काळ्या रेषा या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात; वेळीच लक्ष द्या आपल्या डोळ्याचा हा धक्कादायक अनुभव तिने सोशल मीडिया वर शेअर केला आहे. जे लुईससोबत घडलं ते कुणासोबतही घडू शकतं, त्यामुळे डोळ्याच्या अशा समस्या उद्भवल्यास त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात