नवी दिल्ली, 26 जानेवारी : इंडोनेशियाचा आर्या परमाना हा चार वर्षांपूर्वी त्याच्या वजनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला होता. त्यावेळी 10 वर्षांचा असलेला आर्या 193 किलो वजनाचा होता. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून त्याचे फोटो बघितले तर हा चार वर्षापुर्वीचा आर्या आहे यावर विश्वासच बसणार नाही. तेव्हाच्या तुलनेत आता त्याने वजन घटवलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत त्याने वजन कमी करण्यासाठी कसे कष्ट घेतले हे दाखवण्यात आलं आहे.
आर्या 10 वर्षाचा असताना 2016 मध्ये त्यानं वजन कमी करण्यासाठी मेहनत सुरू केली. त्याच्या वडिलांनी सांगितलं की,'डाएट, नियमित व्यायाम त्याने सुरु केला. दरम्यान, त्वचा काढून टाकण्यासाठी त्याच्यावर सर्जरीही करावी लागली. आर्याचा ट्रेनर अदेने सांगितलं की, जेव्हा पहिल्यांदा आर्याच्या आई-वडिलांना भेटलो तेव्हा त्याच्या दिनचर्येबद्दल माहिती घेतली. त्यानंतर त्याच्या खाण्या-पिण्यात बदल केले. तसेच आर्यालाही प्रोत्साहन दिलं.
सुरुवातीला आर्या सहज करता येईल असे व्यायाम करायचा. त्यानंतर त्याला अवघड असे व्यायामाचे प्रकार करायला सुरुवात केली. त्याला पहिल्यांदा त्रास झाला पण त्याने हा सर्व त्रास सहन केला.
जन्म झाल्यानंतर आर्याचे वजन साडेतीन किलो इतकं होतं. पण 2014 नंतर त्याचं वजन वाढलं. 8 वर्षानंतर वजनाची वाढ अनिंयत्रित होती. त्यामुळे दोन वर्षातच त्याचे वजन 88 किलोंनी वाढलं होतं. त्यानंतर आर्याचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
VIDEO : 185 किमी स्पीडनं गाडी हवेत उडाल्याने भयंकर अपघात, पुढे जे घडलं...