जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'या' नदीत उतरल्यावर नक्की कोण पाय खेचतं? काय आहे प्रकरण?

'या' नदीत उतरल्यावर नक्की कोण पाय खेचतं? काय आहे प्रकरण?

गाझियाबादमध्ये नदीत उतरल्यावर कोणीतरी पाय खेचतं

गाझियाबादमध्ये नदीत उतरल्यावर कोणीतरी पाय खेचतं

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मुरादनगर येथे छोटा हरिद्वारमध्ये सध्या प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. ‘नदीत उतरल्यावर कोणीतरी पाय खेचतं’, अशी अफवा येथे पसरली आहे.

  • -MIN READ Local18 Ghaziabad,Uttar Pradesh
  • Last Updated :

विशाल झा, प्रतिनिधी गाझियाबाद, 4 जून : गंगेच्या पाण्यात आंघोळ केली की, आयुष्यभराचे पाप धुवून निघतात, अशी प्राचीन काळापासून चालत आलेली मान्यता आहे. त्यामुळे अनेकजण आयुष्यात एकदातरी गंगेत न्हाऊन निघावं, अशी इच्छा मनात बाळगतात. परंतु या पाण्यात उरल्यावर कोणीतरी पाय खेचतं, असं तुम्ही कधी ऐकलंय का? खरंतर याच भीतीने सध्या भाविक प्रचंड भयभीत झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मुरादनगर येथे छोटा हरिद्वारमध्ये सध्या प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. ‘नदीत उतरल्यावर कोणीतरी पाय खेचतं’, अशी अफवा येथे पसरली आहे. परंतु तपासातून मात्र काहीतरी वेगळंच समोर आलं.

News18लोकमत
News18लोकमत

नेमकं काय आहे प्रकरण? छोटा हरिद्वारमध्ये अनेक होड्या आहेत, ज्यामधून भाविक अतिशय सुरक्षितरित्या नदीचा प्रवास करू शकतात. शिवाय याठिकाणी पाण्यात जिथे जिथे धोका आहे, तिथे बोर्ड लावण्यात आले आहेत, जेणेकरून नाविक पाण्याचा वेग पाहून होडीचा वेग कमी-जास्त करू शकतात. तसेच महात्मा मुकेश गोस्वामी हेसुद्धा माईकवरून सतत सुरक्षित प्रवास करावा अमुक-अमुक ठिकाणी धोका असू शकतो, अशा सूचना देत असतात. मग इतकी सुरक्षितता असतानाही बुडण्याच्या घटना घडतातच कशा, असा प्रश्न पडला. Ajab Gjab : या विमानात कोणी फिरतं नग्न, तर कोणी बिकिनीत… जगातील विचित्र प्रवास याबाबत मुकेश गोस्वामी यांनी सांगितलं की, याठिकाणी 24 तास 6-7 रक्षक आपलं कर्तव्य बजावत असतात. रक्षक सहसा कोणाला बुडू देतच नाहीत, परंतु कोणी बुडत असेल तर त्याला वाचवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात. त्यांना उत्तम पोहता येतं, एक रक्षक दोन व्यक्तींना बुडण्यापासून वाचवू शकतो. रक्षकांच्या पूर्ण टीमकडे लाईफ जॅकेट असतात. तसेच बुडणाऱ्या व्यक्तीच्या दिशेनेही लाईफ जॅकेट फेकलं जातं. ज्याद्वारे ते स्वतः स्वतःचं संरक्षण करू शकतात. त्याचबरोबर पाण्यात कोणीतरी पाय खेचतं, याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, ही निव्वळ अफवा आहे. इथे कोणीच कोणाचे हात-पाय खेचत नाही. या ठिकाणाचे नाव बदनाम करण्यासाठी ही अफवा पसरवून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र ‘लोकांनी घाबरू नये, त्यांच्या रक्षणासाठी आम्ही आहोत’, असा विश्वास तेथील रक्षकांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात