नवी दिल्ली, 30 मार्च : प्रत्येक कर्मचारी आपल्या कंपनीसाठी आठ नऊ तास काम करतो. स्वतःच्या घरापेक्षा जास्त वेळ ते कंपनीलाच देत असतात. कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी कंपनी नवनवीन गोष्टी करत असते. कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी कंपन्या विविध कसरती करतात. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की एका कंपनीने ऑफिसमध्ये चीअरलीडर्स ठेवल्या आहेत जेणेकरून ते कर्मचाऱ्यांचे मनोरंजन करू शकतील. एका कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना झोपेच्या दिवशी सुट्टी दिली जेणेकरून त्यांची झोप पूर्ण होईल. मात्र सध्या समोर आलेल्या घटनेनं तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. हाँगकाँगच्या एका कंपनीने जे केले ते आश्चर्यचकित करणारे आहे. कंपनीने नोटीस काढली की खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या कानाखाली मारावी. तेही सगळ्यांसमोर. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार, ही एक विमा कंपनी आहे. नुकतीच ही बातमी समोर आली जेव्हा कर्मचार्यांनी फेसबुकवर पोस्टर शेअर करून त्यांची कहाणी शेअर केली. कंपनीचे वार्षिक फंक्शन ठेवण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रात्रीचे जेवण चालू होते. त्यानंतर विमा कंपनीचे बॉस स्टेजवर आले आणि त्यांनी कमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. आणि एकमेकांच्या कानाखाली देण्यास सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांना हे वर्तन अपमानास्पद वाटले आणि त्यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. हेही वाचा - संतप्त गेंड्याचं भयानक रुप; पर्यटकांनी कसाबसा वाचवला जीव, Shocking Video ही घटना सध्या वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरत आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. लोक या कंपनीविषयी राग व्यक्त करत आहेत. लोकांनी याला हिंसक वर्तन म्हटलं आणि अशा कंपनीवर तात्काळ बंदी घातली पाहिजे असं सांगितलं. काही लोकांनी असेही म्हटले की ही कोणती विमा कंपनी आहे, मला नाव कळलं तर मी त्याची पॉलिसी घेतली असेल तर ती लगेच रद्द करून घेईन. जी कंपनी आपल्या कर्मचार्यांना चांगले वागवू शकत नाही, ती इतरांशी कशी वागेल.
दरम्यान, वेगवेगळ्या कंपन्यांविषयी निरनिराळ्या, विचित्र घटना समोर येत असतात. आपण विचारही केला नसता अशा घटना समोर येतात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात.