नवी दिल्ली, 29 मार्च : जंगल, जंगलातील प्राणी याविषयी प्रत्येकाला कुतुहल वाटत असतं. मात्र वन्य प्राण्यांना पाहण्याची, त्यांची जीवशैली जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. यासाठी ते पार्क, जंगल सफारीसाठीही जातात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळतात. कधी कधी हल्ल्यांचे भयंकर व्हिडीओही समोर येत असतात. अशातच जंगल सफारीदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये गेंड्याचा संतप्त अवतार दिसून आला.
जंगल सफारीदरम्यानच्या एका संतप्त गेंड्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक जंगल सफारीचा आनंद लुटत होते. अचानक त्यांच्या गाडीमागे एक अवाढव्य संतप्त गेंडा लागतो. खूप वेळ तो गेंडा गाडीचा पाठलाग करतो. गेंडा खूप आक्रमकपणे गाडीच्या जवळ येतानाही दिसतो. हे पाहून तुमचाही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
View this post on Instagram
Latest Sightings नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. चिखलाच्या रस्त्यावरुन गाडी भरधाव वेगाने पळवत गाडीतील लोकांनी संतप्त गेंड्यापासून आपला जीव वाचवला. मात्र गेंडाही भरपूर स्पीडने चिखलातून पळत गाडीमागे धावताना दिसला. हा संपूर्ण प्रकार श्वास रोखून धरणारा होता. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.
दरम्यान, जंगलात जायचं म्हटल्यावर एकापेक्षा एक भयानक प्राणी पहायला मिळतात. कोण कधी चवताळेल काही सांगता येत नाही. आत्तापर्यंत जंगल सफारीदरम्यानच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक भयावह घटना लोक कॅमेऱ्याक कैद करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Shocking video viral, Viral