मराठी बातम्या /बातम्या /Viral /खाद्यपदार्थांमधलं मीठ कमी-जास्त करणारी स्मार्ट भांडी बाजारात; जपानी संशोधकाचा अनोखा शोध

खाद्यपदार्थांमधलं मीठ कमी-जास्त करणारी स्मार्ट भांडी बाजारात; जपानी संशोधकाचा अनोखा शोध

 कधीकधी खाद्यपदार्थात (Food) मीठ (Salt) कमी किंवा जास्त होतं. मीठ कमी झालेलं असताना खुर्चीत बसल्या बसल्याच अन्नात मीठ घालता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं.

कधीकधी खाद्यपदार्थात (Food) मीठ (Salt) कमी किंवा जास्त होतं. मीठ कमी झालेलं असताना खुर्चीत बसल्या बसल्याच अन्नात मीठ घालता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं.

कधीकधी खाद्यपदार्थात (Food) मीठ (Salt) कमी किंवा जास्त होतं. मीठ कमी झालेलं असताना खुर्चीत बसल्या बसल्याच अन्नात मीठ घालता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : कधीकधी खाद्यपदार्थात (Food) मीठ (Salt) कमी किंवा जास्त होतं. मीठ कमी झालेलं असताना खुर्चीत बसल्या बसल्याच अन्नात मीठ घालता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं. हे काम अवघड वाटत असलं तरी आता संशोधकांनी या आळशीपणावर उपाय शोधला आहे. ही खास भांडी जवळ असतील, तर जेवणात मीठ घालण्यासाठी जेवताना मध्येच उठावं लागणार नाही किंवा कोणाकडे मागावंही लागणार नाही आणि चवीबाबत तडजोडदेखील करावी लागणार नाही.

    ज्यांना जास्त मीठ खाण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी ही भांडी (Utensils) अगदी उपयुक्त आहेत. जपानमधल्या (Japan) संशोधकांनी काही स्मार्ट भांडी (Smart Utensils) बनवली आहेत. यामुळे अन्नात मीठ कमी असेल तर वरून मीठ घालण्याची गरज भासणार नाही. कारण या भांड्यांमुळे अन्नात आपोआपच मिठाचं प्रमाण वाढू शकतं. हे भांडं अन्नातलं मिठाचं प्रमाण वाढवण्यासाठी विजेचा (Electricity) वापर करतं. लवकरच ही भांडी सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत.

    हेही वाचा -  स्टाफने दीड तासांत केली अशी गोष्ट की बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, नेमकं काय आहे प्रकरण?

    मीठ न घालता अन्नाला येईल मिठाची चव

    जपानमधल्या मीजी युनिव्हर्सिटीतल्या (Meiji University) शास्त्रज्ञांनी आणि किरिन होल्डिंग्ज डेव्हलपर्सनी मिळून एक वाटी आणि चमचा तयार केला आहे. या दोन्ही भांड्यांमुळे अन्नाला आपोआप मिठाची चव येईल. काही महिन्यांपूर्वी, अशाच तंत्रज्ञानावर आधारित खास चॉपस्टिक्स (Chopsticks) तयार करण्यात आल्या होत्या. यामुळे मिठाचा वापर न करताही अन्नाला खारट चव येते. परंतु आता अशाच प्रकारची वाटी आणि चमचा विकसित करण्यात आला आहे. या दोन्ही वस्तूंच्या वापराने अन्नाला मिठाची चव येईल. या भांड्यांमध्ये एक इनबिल्ट बॅटरी असेल, त्यामुळे सतत वीज पुरवठ्याची गरज भासणार नाही. `सोरा न्यूज 24` च्या वृत्तानुसार, स्मार्ट चमचा आणि वाटीमुळे अन्नातलं मिठाचं प्रमाण दीडपट वाढेल.

    मिठाचं सेवन मर्यादित करण्याचा सर्वोत्तम मार्ग

    ही वाटी आणि चमच्याच्या मदतीने जेवण अधिक चविष्ट बनवलं जाऊ शकतं. तसंच यामुळे अतिरिक्त मीठ वापरणं टाळता येतं. त्यामुळे ज्या व्यक्ती कमी मीठ खातात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असेल. हे उत्पादन पुढील वर्षी जपानी बाजारात (Japan Market) दाखल होईल; मात्र त्याची किंमत अद्याप ठरलेली नाही. यापूर्वी बनवलेल्या चॉपस्टिक्सबाबत एक समस्या होती. त्या चॉपस्टिक्स वापरण्यासाठी पॉवर सोर्सची गरज होती. त्यामुळे युझर्सना चॉपस्टिक्स हातावर परिधान कराव्या लागत असत. परंतु, या नव्या उत्पादनांचा वापर करताना असं कोणतंही बंधन युझर्सवर नसेल. त्यामुळे हा नावीन्यपूर्ण शोध सर्वांचा उत्साह वाढवणारा आहे.

    First published:

    Tags: Food, Lifestyle, Research, Viral