मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्टाफने दीड तासांत केली अशी गोष्ट की बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, नेमकं काय आहे प्रकरण?

स्टाफने दीड तासांत केली अशी गोष्ट की बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, नेमकं काय आहे प्रकरण?

जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांना मिल्कशेक (Milkshake) खूप आवडतो. अगदी लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांचा यामध्ये समावेश आहे. वयाने कितीही मोठे झाले तरी काहींचं मिल्कशेकवरील प्रेम कमी होत नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर: जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांना मिल्कशेक (Milkshake) खूप आवडतो. अगदी लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांचा यामध्ये समावेश आहे. वयाने कितीही मोठे झाले तरी काहींचं मिल्कशेकवरील प्रेम कमी होत नाही. अशा लोकांना त्यांना वेगवेगळ्या फ्लेवरचे मिल्कशेक (Milkshake Flavour) मिळत असलेली दुकानंही खूप आवडतात. अमेरिकेतील (America) अॅरिझोनामध्ये असंच एक दुकान आहे, त्या दुकानदाराने मिल्कशेकचे इतके फ्लेवर तयार केले आणि सर्व्ह केले की त्यांचं नाव जगभर प्रसिद्ध झालं आहे.

अमेरिकेतील सेलिग्मन (Seligman) येथील एका आईस्क्रीम शॉपने (Ice cream Shop) दीड तासांत 266 वेगवेगळ्या फ्लेवरचे मिल्कशेक सर्व्ह करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) आपलं नाव नोंदवलं आहे. स्नो कॅप (Snow Cap) असं या दुकानाचं नाव आहे. या दुकानातर्फे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ते यशस्वी ठरले. खरं तर या दुकानात इतके मिल्कशेक फ्लेवर्स बनवण्यात आले की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

नाचो-बर्गर आणि विचित्र शेक

तुम्हीही विचार करत असाल की या दुकानदाराने इतक्या फ्लेवर्सचे मिल्कशेक कसे तयार केले असतील? किंवा त्याबरोबर इतके प्रयोग कसे केले असतील? तर त्यांनी स्नो कॅपमध्ये जेवढे फ्लेवर्स होते, ते सर्व वापरून नवनवीन फ्लेवर्स ट्राय केले. या दुकानात नाचो, बर्गर (Burger) आणि इतर स्नॅक्स (Snacks) सोबत मिक्स करून मिल्कशेक बनवण्यात आले. एक कुटुंब हे दुकान चालवतं आणि या दुकानात मिल्कशेक आणि आईस्क्रीम मिळतात. त्यांनी मिल्कशेकचे विविध प्रयोग करताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी उपस्थित होते. एकूण 266 फ्लेवर्सचे मिल्कशेक बनवण्याचं काम त्यांनी 1 तास 35 मिनिटांत पूर्ण केलं.

View this post on Instagram

A post shared by Mobil 1 (@mobil1)

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलं रेकॉर्ड

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून या रेकॉर्डबद्दलही माहिती शेअर केली आहे. 'स्नो कॅप स्टाफ आणि प्रेमळ कुटुंबीयांच्या सपोर्टशिवाय आम्ही हे करू शकलो नसतो. आम्ही हे रेकॉर्ड 1 तास 35 मिनिटांत पूर्ण केलं, अशी कॅप्शन या रेकॉर्डच्या पोस्टला देण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या रेकॉर्डची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान, यापूर्वी 2000 विद्यार्थ्यांनी तिरुअनंतपुरममधील लुल मॉलमध्ये एकूण 100 पुकलम्स म्हणजेच फ्लॉवर कार्पेट्स सजवून ओणम साजरा केला होता. हा विक्रमही चांगलाच चर्चेत राहिला होता.

First published:

Tags: Food, Lifestyle, Viral