नवी दिल्ली 05 डिसेंबर : जगातील प्रत्येक महिलेला सुंदर दिसण्याची इच्छा असते. यासाठी बऱ्याच महिला अनेक प्रकारच्या ब्यूटी ट्रीटमेंट (Beauty Treatment) घेतात. प्रत्येक पुरुषालाही असं वाटतं की माझी पत्नी सुंदर दिसावी. मात्र तुम्ही असं कधी ऐकलं आहे का की काही ठिकाणचे पुरुष स्वतःच आपली पत्नी कुरूप दिसावी यासाठी प्रयत्न करतात (Husband make Women Ugly). मुर्सी जमातीच्या महिलांसोबत मात्र हे प्रत्यक्षात घडतं (Weird Rituals Of Mursi Tribe). जुन्या परंपरेनुसार, या महिला आपल्या ओठांमध्ये एक मोठी डिस्क घालतात. मुर्सी ही आदिवासी जमात आहे. त्यांच्या अनेक परंपरा अतिशय विचित्र आहेत. यातील काही जमाती भयंकरही आहेत. काही जमातींमध्ये महिलांना खूप महत्त्व दिले जाते तर काहींमध्ये त्यांच्यावर अत्याचार केले जातात. अशीच एक जमात म्हणजे मुर्सी. मुर्सी जमात दक्षिणेकडील इथिओपियाच्या जंगलात राहते. त्यांना जगातील सर्वात धोकादायक जमात मानले जाते. ही जमात महिलांवरील अत्याचारासाठी कुप्रसिद्ध आहे. मुर्सी जमातीच्या महिलांना बॉडी मॉडिफिकेशन करावे लागते. या जमातीतील पुरुष आपल्या स्त्रियांना अनाकर्षक बनवण्यासाठी विविध भयंकर गोष्टी करतात. यासाठी ते महिलांच्या ओठात गोल आकाराचे लाकूड घालतात. त्यामुळे महिलांचे ओठ खाली लटकतात. पुरुषांचा असा विश्वास आहे की जर स्त्रिया अनाकर्षक दिसल्या तर त्यांच्यावर कोणाचीही वाईट नजर पडणार नाही. स्त्रियांनाही या परंपरांचे पालन करून कुरूप व्हायला आवडते.
मुर्सी जमात ही जगातील सर्वात धोकादायक जमात मानली जाते. हे लोक कोणाचीही हत्या करायला मागेपुढे पाहत नाहीत. एखाद्याचा जीव घेणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हत्या करण्यासाठी ते धोकादायक शस्त्रे बनवतात. जंगलातून लाकूड आणून ही शस्त्रे बनवली जातात. ही शस्त्रे एवढी धारदार असतात की ती क्षणार्धात कोणाचाही जीव घेऊ शकतात. इथिओपियामध्ये मुर्सी जमातीचे सुमारे 10 हजार लोक राहतात. त्यांच्या हद्दीत कोणी विनापरवाना गेला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे.