नवी दिल्ली 08 जुलै : वधू आणि वर आपल्या लग्नाबद्दल खूप उत्सुक असतात. त्यांच्यासाठी हा खूप खास दिवस असतो, ज्यानंतर ते पती-पत्नी म्हणून एकत्र आयुष्यातील सर्व सुख-दु:ख अनुभवण्यास तयार होतात. लग्नानंतर जोडपी आपल्या मधुचंद्रासाठीही उत्सुक असतात. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा रोमान्स दोघांसाठी खास असतो. पण एका महिलेसाठी हनिमूनचा हा अनुभव तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव ठरला. याचं कारण नवऱ्याचं वागणं होतं. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, रेशियल नावाच्या महिलेनं ऑस्ट्रेलियातील ‘Hot Nights With Abbie Chatfield’ या रेडिओ शोमध्ये कॉल केला आणि तिच्या माजी पतीबद्दलची अजब गोष्टी सांगितली. महिलेनं सांगितलं की, लग्नानंतर दोनच आठवड्यांत तिचा घटस्फोट झाला होता. याचं कारण म्हणजे दोघांनी त्यांच्या हनीमूनला रोमान्स केला नाही. लग्नानंतर काहीच दिवसात समजलं पत्नीचं धक्कादायक सत्य, जळगावातील तरुणाची कोर्टात धाव अन्.. रेशियलने रेडिओवर सांगितलं की, लग्नाच्या रात्री ते फिरायला गेले होते, तिथे ते खूप थकले होते. यानंतर, जेव्हा ते त्यांच्या हॉटेलमध्ये परतले तेव्हा पतीने त्याला रोमान्स करायचा असल्याचं सांगितलं., परंतु रेशियल इतकी थकली होती की तिने नकार दिला. यामुळे पती चांगलाच संतापला होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी 24 तासही उलटले नसताना पतीने घटस्फोटाचा मुद्दा उपस्थित केला. रेशियलच्या वागण्यामुळे तो रागावला असून घटस्फोट हवा आहे, असं त्याने सांगितलं. रेशियलला याचं खूप आश्चर्य वाटलं आणि लग्नाच्या 2 आठवड्यांनंतर हे जोडपं अधिकृतपणे वेगळं झालं. शोच्या अँकरने महिलेच्या माजी पतीला खूप वाईट व्यक्ती म्हटलं. रेशियलने सांगितलं की, या अनुभवामुळे ती खूप निराश झाली आणि आता तिला तिच्या पतीपासून पूर्णपणे वेगळं व्हायचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.