• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • बर्गरमध्ये आढलेलं माणसाचं तुटलेलं बोट, महिलेने शेअर केला भयंकर अनुभव

बर्गरमध्ये आढलेलं माणसाचं तुटलेलं बोट, महिलेने शेअर केला भयंकर अनुभव

बर्गर तयार करणाऱ्या व्यक्तीचं बोट मीट ग्राइंडरमध्ये सापडून तुटलं होतं आणि ते बर्गरमध्ये (Burger) गेलं. फॅक्टरीने तसाच बर्गर पॅक केला आणि बाजारात पाठवून दिला.

  • Share this:
बोलिव्हिया, 17 सप्टेंबर : पिझ्झा, बर्गर वगैरे फास्ट फूड आता अगदी सहज उपलब्ध असतात. ते जंक फूड असलं, त्याचे आरोग्याला अनेक तोटे असले, तरी ते खाल्लं जाण्याचं प्रमाण मोठं आहे. चटपटीत चव, शिवाय ते पटकन ऑर्डर करता येतात आणि झटपट घरपोचही मिळवता येतात. अलीकडेच परदेशातल्या एका महिलेने तिचा फास्ट फूडबद्दलचा (Fast Food) असा अनुभव शेअर केला आहे, की तो वाचल्यावर तुम्हीही पॅक्ड जंक फूड खरेदी करण्याबद्दल हजारदा विचार कराल. बोलिव्हियातल्या (Bolivia) एस्टेफनी बेनिटेज (Estefany Benitez) नावाच्या एका महिलेने हा अनुभव शेअर केला आहे. तिने एका सुपरमार्केटमधून रेडी टू इट बर्गर खरेदी केला होता. घरी आल्यानंतर तिने तो गरम केला आणि ती खायला बसली. त्यानंतर तिला आलेल्या अनुभवाने ती हैराण झाली. तिने बर्गरचा पहिला घास घेतला आणि त्यात काही तरी कडक वस्तू असल्याचं तिला जाणवलं. म्हणून तिने बर्गरचा वरचा बन बाजूला केला आणि आतमधल्या मांसाच्या तुकड्यात काही वेगळी वस्तू आलीय का, हे ती पाहू लागली. तिला जे काही दिसलं, त्यावर तिचा विश्वासच बसेना. त्या बर्गरमध्ये चक्क माणसाचं एक तुटलेलं बोट (Cut Finger) होतं. ते पाहून त्या महिलेला खूपच विचित्र वाटायला लागलं. बर्गर तयार करणाऱ्या व्यक्तीचं बोट मीट ग्राइंडरमध्ये सापडून तुटलं होतं आणि ते बर्गरमध्ये (Burger) गेलं. फॅक्टरीने तसाच बर्गर पॅक केला आणि बाजारात पाठवून दिला. तो बर्गर या महिलेच्या वाट्याला आला. या महिलेने या प्रकारावर सोशल मीडिया पोस्ट लिहिली आणि त्यासोबत फोटोही शेअर केला.

संताप येईल, किळस वाटेल! क्रिस्पी टोस्ट आवडीने खात असाल तर हा VIDEO जरूर पाहा

हे प्रकरण समोर आल्यानंतर आता अधिकारी याचा अधिक तपास करत आहेत. त्या तपासादरम्यान असं समोर आलं, की बर्गर फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराची दोन बोटं तुटून मीट ग्राइंडरमध्ये गेली होती. बोटांचे तुकडे असतानाही ते मांस तसंच बर्गरमध्ये स्टफ करून ते पॅक करून बाजारात पाठवण्यात आलं. इस्टेफनी या महिलेला एक बोट सापडलं असून, दुसरं बोट कोणत्या ग्राहकाला किंवा कोणत्या मार्केटमधल्या बर्गरमध्ये सापडतंय का, याचा शोध सुरू आहे. मात्र तो बर्गर नेमका कोणत्या आउटलेटमध्ये गेला असेल, याचा शोध लावणं अवघड आहे. त्या महिलेने स्थानिक माध्यमांना सांगितलं, बर्गरचा पहिला चावा घेतल्यानंतर तोंडात काही तरी वेगळंच आल्याचं जाणवलं. म्हणून ती थुकली, तेव्हा लक्षात आलं, की बर्गरमधल्या मांसात माणसाचं बोट आहे. तिने माध्यमांना याबद्दल कळवल्यावर त्यांच्या प्रतिनिधींनी ते तपासून पाहिल्यावर माणसाचं तुटलेलं, कुजलेलं बोट असल्याचं निश्चित झालं.

शिफ्ट सुरू होण्याच्या 9 तास आधी दारु प्यायल्याने गेली तरुणीची नोकरी, पण...

बोलिव्हियाचे डेप्युटी मिनिस्टर ऑफ कंझ्युमर जिफेन्स जॉर्ज सिल्व्हा यांनी सांगितलं, की ही घटना समोर आल्यानंतर हॉट बर्गर नावाच्या या फास्ट फूड चेनवर कारवाई करण्यात आली असून, ती चेन अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या फूड चेनला दंडही ठोठावला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं, की घडलेली घटना दुर्दैवी असून, या घटनेमुळे आम्हालाही त्रास झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसंच, कामगाराची बोटं तुटल्याच्या घटनेनंतर डिलिव्हर करण्यात आलेले सगळे बर्गर पुन्हा कंपनीत मागवले जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
First published: