मुंबई, 11 जुलै : कडक उन्हाळ्यानंतर लोक एकाच गोष्टीची आठवणीने वाट पाहतात ती म्हणजे पावसाची. रिमझिम पावसामुळे थंडावा जाणवतो शिवाय परिसर देखील हिरवागार होतो, ज्यामुळे मन अगदी प्रसन्न होतं. मग बाहेर फिरायला जा, छान भज्जी खा असं लोकांचं मन होतं. परंतु पावसाळ्यात एक गोष्ट लोकांना आवडत नाही ती म्हणजे कीटक, पावसाळ्यात कीटकांची संख्याही खूप वाढते, त्यामुळे काही समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये हवेत उडणाऱ्या कीटकांशिवाय जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांचाही समावेश आहे. यापैकी बरेच कीटक विषारी असतात, जे आपल्याला गंभीर हानी पोहोचवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा 4 टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला या किटकांपासून मुक्ती मिळेल किंवा ते तुमच्यापासून लांब रहातील. कडुलिंब तेल उपाय आयुर्वेदाच्या तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात कडुलिंबाच्या तेलाचा वापर करून कीटकांना घरात प्रवेश करण्यापासून रोखता येते. यासाठी सर्वप्रथम घरातील झाडे स्वच्छ करा. या झाडांमध्ये कीटक लपलेले असतात.कीटकांच्या लपलेल्या जागेवर कडुलिंबाचे तेल शिंपडा. असे केल्याने कीटक तेथून पळून जातील. काळी फिल्म लावा रात्री दिवे लावल्यावर उडणारे लहान घराकडे आकर्षित होते. अशा परिस्थितीत, दरवाजा आणि खिडक्यांना प्रवेश रोखण्यासाठी तुम्ही काळे पडदे लावू शकता. असे केल्याने घराचा प्रकाश बाहेरून दिसत नाही आणि कीटक आत येण्याचा प्रयत्न करत नाहीत. काळी मिरी पावसाळ्यात घरातील किडे दूर करण्यासाठी काळी मिरी वापरणेही खूप फायदेशीर आहे. यासाठी काळी मिरी बारीक करून पाण्यात मिसळा. नंतर ते एका बाटलीत भरून कीटकांच्या लपण्याच्या जागेवर शिंपडा. तुम्हाला किडे पळताना दिसतील. हा उपाय उपयुक्त आहे पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या किड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि बेकिंग सोड्याचाही उपाय करू शकता. यासाठी या दोघांचे द्रावण तयार करून एका बाटलीत भरावे. त्यानंतर ते द्रावण झाडांवर आणि घराच्या कोपऱ्यांवर फवारावे. कीटकांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.