मुंबई 22 जानेवारी : आपल्यापैकी अनेकांची सोशल मीडियावर अकाऊंट्स आहेत. दिवसातील बराचसा वेळ आपण विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतो. कारण सध्याच्या काळात सोशल मीडिया हा टाईमपासचा मुख्य पर्याय बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या गमतीशीर व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज् आणि पझल्सदेखील या ठिकाणी व्हायरल होतात. सध्या असंच एक पझल म्हणजे कोडं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. “माझ्याकडे सहा अंडी आहेत. त्यातली दोन मी फोडली, दोन तळली आणि दोन खाल्ली तर शेवटी किती अंडी उरली?” असं हे कोडं आहे. या कोड्याला ट्विटरवर एक हजार 600 पेक्षा जास्त लाईक्स आणि 400 रीट्विट्ससह 495k पेक्षा जास्त व्ह्यूज् मिळाले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे अंड्याचं कोडं चांगलंच व्हायरल झालं आहे आणि अनेक नेटिझन्सनी ते सोडवण्यात कमालीची उत्सुकता दाखवली आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधताना नेटिझन्सचे दोन गट पडले आहेत. दोन फोडलेल्या अंड्यांपासून दोन फ्राईड एग्ज बनवण्यासाठी, तुम्हाला दोन अंडी फोडावी लागतील. म्हणजेच खाली चार अंडी शिल्लक राहतील. या कोड्याचं उत्तर ‘चार’ आहे," असं ट्विट एका युजरनं केलं आहे. हे ही पाहा : Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं? तुम्ही या प्रश्नांकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता यावर उत्तर अवलंबून आहे: एकूण सहा अंडी, त्यातली दोन फोडली म्हणजे चार शिल्लक राहिली. सहा पैकी दोन फ्राय केली तरी चारच शिल्लक राहतात आणि सहापैकी दोन खाल्ली तरीही चारच शिल्लक राहतात. साधारणपणे, अंडी तळण्यासाठी ती अगोदर फोडली जातात आणि मगच तळून खाल्ली जातात. टरफलासहित अंडं तळल्याचं मला माहीत नाही," असं ट्विट आणखी एका युजरनं केलं आहे. एका युजरचं म्हणणं आहे की, शेवटी सहा अंडी शिल्लक राहतील. “माझ्याकडे सहा अंडी आहेत. त्यातील मी दोन फोडली पण फोडलेल्या अवस्थेत का होईना ती अस्तित्वात आहेत. त्यानंतर मी दोन अंडी तळली. म्हणजे फोडलेली आणि तळलेली मिळून चार झाली. उरलेली दोन मी खाल्ली म्हणजे दोन वजा झाली पाहिजेत. पण, येथे दिलेल्या कोड्यामध्ये कोणती दोन अंडी खाल्ली, हे सांगितलेलं नाही. म्हणजे या सहा अंड्यांपैकी असा उल्लेख कुठंच नाही. त्यामुळे किती अंडी शिल्लक आहेत याबाबत तुम्ही फक्त अंदाज लावू शकता. त्यामुळे कोड्यातील प्रेझेंट टेन्सचा विचार करता शेवटी सहा अंडी शिल्लक राहतील असा माझा तर्क आहे, असं जिप्सी सोल नावाच्या ट्विटर युजरनं सांगितलं आहे. “तुमच्याकडे सध्या जे आहे त्यासाठी तुम्ही वर्तमान काळ वापरला आहे. (माझ्याकडे सहा अंडी आहेत), त्यानंतर दोन अंडी असलेल्या तुमच्या कृतीसाठी तुम्ही भूतकाळ वापरला आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितले आहे, तुम्ही भूतकाळात काय केलं. (दोन अंडी तोडून तळली आणि खाल्ली) म्हणजेच तुमच्याकडे आता सहा अंडी शिल्लक आहेत,” असं आणखी एका युजरनं म्हटलं आहे. पण, बहुतेकांच्या मते, या कोड्याचं उत्तर चार आहे.
मुलांच्या ग्रोथ इयर्समध्ये त्यांना अशा प्रकारची पझल्स सोडवायला दिली तर त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र होण्यास मदत होते. अशा अनेक वेबसाईट्स आहेत, ज्या मुलांसाठी विविध प्रकारचे पझल्स तयार करतात. सोशल मीडियामुळे लहान मुलांसोबतच मोठ्या लोकांचं देखील चांगलं मनोरंजन होत आहे.