असे हात असलेले कित्येक सेलिब्रिटी, बॉडीबिल्डर तुम्ही पाहिले असतील. पण हा हात अशा व्यक्तीचा आहे, की तिला पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.
हा हात आहे एका महिलेचा. व्लादिस्लावा गॅलागन असं तिचं नाव. ती रशियन मॉडेल आहे. तिचं मजबूत शरीर आणि निरागस चेहरा पाहून लोक हैराण होतात.
अवघ्या 27 वर्षांची व्लादिस्लावा गेल्या 11 वर्षांपासून बॉडीबिल्डिंग करते आहे. 2018 सालापासून तिने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली.
मिररच्या रिपोर्टनुसार तिला सोशल मीडियावर तिच्या मसल्सच्या फोटोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते.
गेल्या वर्षी मेमध्ये ओन्ली फॅन्स तिने जॉईन केलं. तिथं कन्टेट टाकू लागली. इथून तिची लाखो रुपयांची कमाई होते.
अनेकांना तिचे मसल्स पाहून फोटोशॉप केल्याचं वाटतं. पण ती फिटनेस मॉडेल आहे आणि मेहनतीने तिने बॉडी बनवली आहे, असं तिने स्पष्ट केलं आहे.