Home /News /viral /

ना कार, ना घोडा, ना बँड; नवरीला आणण्यासाठी थेट JCB घेऊन पोहोचला मंडपात

ना कार, ना घोडा, ना बँड; नवरीला आणण्यासाठी थेट JCB घेऊन पोहोचला मंडपात

नवरीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांवर बऱ्याच अडचणी होत्या, पण माघार घेणारा तो नवरदेव कसला...

    हिमाचल प्रदेश, 24 जानेवारी : सत जन्माच्या गाठी बांधण्यासाठी अचानक झालेला बर्फाच्या पाऊस अडचण ठरत होता. अशा वेळी माघार घेणारा नवरदेव तो काय...पठ्ठ्याने कोणाचीही पर्वा न करता आपल्या नवरीला आणण्यासाठी थेट जेसीबी (JCB) घेऊन मंडपात पोहोचला. ही कोणा चित्रपटाची कथा नाही तर हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh News) गिरीपाल भागातून सत्य घटना आहे. (Himachal When the snowfall blocked the way the groom reached to pick up the bride with JCB machine) रविवारी सकाळी संगहाडहून रतवा गावासाठी वरात निघाली होती. त्यातच बर्फाचा पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे वरातीला लग्नाच्या स्थळी पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यात रस्तेदेखील बर्फामुळे बंद झाले होते. पुढे जाणे अशक्य होते. त्यामुळे नवरदेवाचे वडील जगत सिंहने पुढे जाण्यासाठी जेसीबी मशीनची सोय केली. हे ही वाचा-ऋतुंचा जांगडगुत्ता! थंडीसह धुक्याची दुहेरी बॅटींग, 122 वर्षातील सर्वाधिक पाऊस यात नवरदेव विजय प्रकार, भाऊ सुरेंद्र, वडील जगत सिंह, फोटोग्राफर यांना बसवून 30 किमीपर्यंत प्रवास केला. तेथे लग्नाच्या सर्व विधी केल्या आणि नवरीला जेसीबीमध्ये घेऊन परतले. गिरीपार भागातील गत्ताधार गावात पाऊस आणि हिमवर्षावामुळे रस्ते बंद झाले होते. त्यामुळे कार घेऊन रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे होते. त्यामुळे नवरदेवाच्या वडिलांनी जेसीबीची व्यवस्था केली. यात नवरदेवासह त्याचे वडील, भाऊ, मामा वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचले. वेळ तसा बराच झाला होता. मुहूर्ताची वेळही निघून गेली होती. मात्र हिमवर्षावामुळे काहीच दुसरा पर्याय नव्हता. शेवटी वऱ्हाडी मंडळी अशा प्रकारे नवरीच्या घरी पोहोचले. येथे लग्न समारंभ उरकून नवरीला घेऊन ते जेसीबीनेच घरी परतले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Himachal pradesh, Iceland, Rains

    पुढील बातम्या