मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : डोंगरावरुन मोठ-मोठे दगड कोसळत होते, खालून जात होत्या गाड्या; निसर्गाचं भयावह रुप पाहून हादराल

VIDEO : डोंगरावरुन मोठ-मोठे दगड कोसळत होते, खालून जात होत्या गाड्या; निसर्गाचं भयावह रुप पाहून हादराल

काल एका प्रवासी बससह अनेक गाड्या दरडीखाली दबल्या गेल्या. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा धक्कादायक VIDEO समोर आला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

किन्नौर, 12 ऑगस्ट : देशातील अत्यंत सुंदर राज्यांमध्ये हिमाचल प्रदेशचं (Himachal Pradesh News) नाव घेतलं जातं. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून लोकांचं मन प्रसन्न करणारा निसर्ग त्यांच्याच जिवावर उठल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसात हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. आणि यात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh News) किन्नौर (Kinnaur Landslide)येथे पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तब्बल 30 चे 35 प्रवासी असलेली बस ढिगाऱ्याखाली दबली गेली. समोर आलेल्या माहितीनुसार, बस अजूनही ढिगाऱ्याखाली (Debris)अडकली आहे. बचाव दलाकडून मदत कार्य आणि  रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Team) सुरु आहे. आतापर्यंत 13 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

दरम्यान 13 लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. यातले 10 मृतदेह बुधवारी बाहेर काढण्यात आलेत. एक बस, बोलेरो आणि त्यातील प्रवाशांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. काल रात्री अंधार पडल्यानं रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. (Himachal Pradesh Kinnaur Landslide shocking video )

हे ही वाचा-VIDEO: अन् पावसात बंद पडलेल्या कार मालकाच्या मदतीला कुत्रा आला धावून

" isDesktop="true" id="591141" >

दरम्यान रेस्क्यू ऑपरेशनदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या दुर्घटनेत एका बस ड्रायव्हरचं रेस्क्यू करीत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. महिंद्र पाल सिंह असं या ड्रायव्हरचं नाव आहे. न्यूज18 शी बोलताना ड्रायव्हरने सांगितलं की, अपघाताच्या वेळी 30 ते 32 लोक प्रवास करीत होते. सोबतच हायवेवर अनेक गाड्या उभ्या होत्या. या सर्व गाड्या दरडीखाली दबल्या गेल्या आहेत. तर बस कंडक्टरच्या पायाला जखमी झाली आहे. त्यानंतर कंडक्टरलाही बाहेर काढण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर आहे.

First published:

Tags: Himachal pradesh, Shocking viral video, Viral video.