जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! ...अन् कारचे तुकडे तुकडे झाले; भयंकर अपघाताचा LIVE VIDEO

बापरे! ...अन् कारचे तुकडे तुकडे झाले; भयंकर अपघाताचा LIVE VIDEO

बापरे! ...अन् कारचे तुकडे तुकडे झाले; भयंकर अपघाताचा LIVE VIDEO

Car accident video : कार अपघाताचा भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : जगात कितीतरी रस्ते अपघात (Road Accidents video) होतात. काही जण स्वतःच्या चुकीमुळे तर काही इतरांच्या चुकीमुळे अशा अपघातात आपला जीव गमावतात किंवा त्यांना कायमचं अपंगत्व येतं. अशाच एका कार अपघाताचा भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Car accident video). एका कारचं इतका खरतनाक अपघात झाला आहे, जो पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. व्हिडीओत पाहू शकता रोडवर बऱ्याच गाड्या सामान्य वेगाने चालत आहेत. तितक्यात एक कार भरधाव वेगात येते आणि या सर्व गाड्यांना मागे टाकत पुढे जाते. पुढे जाऊन ही कार आपला मार्गही बदलते. उजव्या बाजूने थेट डाव्या बाजूच्या मार्गावर जाते आणि एका झाडाला धडकते. कारचा वेग इतका असतो की झाडाला ती इतक्या जोरात टक्कर मारते आणि त्यानंतर कार हवेत उडत दुसऱ्या रस्त्यावर जाते. कारचा पूर्ण चक्काचूर झालेला दिसतो आहे. कारची मागील बाजू पूर्णपणे खिळखिळी झालेली दिसते. हे वाचा -  3-3 बलाढ्य सिंहांनाही भारी पडलं एक छोटंसं कासव; कधीच पाहिला नसेल असा VIDEO त्यानंतर याच मार्गावरून जाणाऱ्या एका कारमधील ड्रायव्हर लगेच बाहेर येतो आणि या गाडीजवळ जात गाडीतील ड्रायव्हर जिवंत आहे की नाही ते पाहतो. आता हा अपघात पाहता कदाचित या गाडीतील ड्रायव्हर जिवंत राहिला नसावा किंवा जिवंत असेल तर त्या गंभीर दुखापत झालेली असावी.

जाहिरात

geekscars नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपघाताचा हा भयंकर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे हे माहिती नाही. पण खूपच भयानक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात