• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मुंबईत पावसाचा जोर वाढला; मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

मुंबईत पावसाचा जोर वाढला; मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

मुंबईत पावसाचा जोर वाढत आहे, तर जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 17 मे : तौत्के चक्रीवादळाचा परिणाम मुंबई आणि उपनगरांमध्ये (Cyclone Taukae Mumbai Updates) सोमवारी दुपारनंतर जास्त जाणवू लागला आहे. किनाऱ्याजवळ तर तुफान वेगाने वारे वाहात आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात दुपारी 11 वाजल्यापासून तुफान पावसालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान मरीन ड्राईव्ह येथे समुद्राच्या उंच लाटा पाहायला मिळाल्या आहे. समुद्राचं रौद्र रुप पाहून कोणालाही भीती वाटेल. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई आणि किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनाही समोर आल्या आहे. मुंबईजवळच्या समुद्रकिनाऱ्यांवरचं हे दृश्य. मुंबईत आज IMD ने Cyclone tauktae मुळे Red Alert जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात सोमवारी दुपारपासून तुफान वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. हे ही वाचा-भयंकर चक्रीवादळातही प्रामाणिकपणे करीत होती स्वत:चं काम, आनंद महिंद्राकडून कौतुक तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम आता कल्याण डोंबिवलीतही जाणवू लागला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून शहरात जोरदार वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे शहरात ठिक ठिकाणी झाडं तसेच झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. डोंबिवली रेल्वे स्टेशन नजीक कोपरच्या दिशेने जाणाऱ्या सहाव्या मार्गिकेवरील ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याची घटना घडली. या मार्गिकेवरून लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईच्या दिशेने जातात .त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: