मुंबई : उन्हाळ्यात पाणी पिणं शरीरासाठी चांगलं आहे. यामुळे शरीर हायड्रेट रहातं. लोकांना उन्हातून आलं किंवा घरी थंडगार पाणी प्यायचं मन होतं. तेव्हा मटक्याचा पर्यात सर्वात चांगला आणि सोयीचा असतो. कारण याला वीज लागत ना पैसे. ते अगदी नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड करुन देते शिवाय याचे अरोग्यासाठी फायदेही अधिक आहेत. मात्र मडका वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नवीन मटका कसा वापरायचा नवीन भांडे वापरण्यासाठी, ते आधी स्वच्छ आणि साफ असणे गरजेचे आहे. यासाठी नळाच्या पाण्याने मडकं धुवा. नंतर 24 तास भांडे पाण्याने भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी काढून टाका. हे पाणी तुम्ही झाडांना वापरू शकता. दुसऱ्या दिवशी हे पुन्हा करा. सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य? त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून शुद्ध पाणी पिण्यास सुरुवात करा. भांडे कधीही कापडाने गुंडाळू नका कारण यामुळे पाणी थंड होण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते. आता प्रश्न असा उभा राहातो की हे भांडे किती दिवस वापरायचे? कोणतंही सामान्य मडकं वर्षभर वापरता येतो. तसेच जर तुमच्या लक्षात आले की भांड्याला काही क्रॅक आहेत किंवा पाणी थंड होत नाही, तर तुम्हाला ते बदलण्याची आवश्यकता आहे. मडक्याचे पाणी पिण्याचे फायदे मडक्याच्या पाण्यात पुरेसे पोषक आणि खनिजे असतात जे सन स्ट्रोक टाळतात आणि शरीरात ग्लुकोज टिकवून ठेवतात. मडक्याचे पाणी पिल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते आणि पचन आणि चयापचय सुधारते. मानवी शरीर आम्लयुक्त असते आणि मडक्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात जे चांगले पीएच पातळी राखण्याचा प्रयत्न करतात.
या गोष्टींची काळजी घ्या उन्हाळ्यात भांड्यात पाणी भरले तर ते रोज पाण्याने स्वच्छ करावे. अन्यथा त्याला फंगस किंवा शेवाळ येऊ शकतं आणि आरोग्यास हानी पोहोचवू शकतं.