मराठी बातम्या /बातम्या /Viral /बिबट्याला कधी व्यायाम करताना पाहिलंय का? Video होतोय व्हायरल

बिबट्याला कधी व्यायाम करताना पाहिलंय का? Video होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आपलं आरोग्य, वजन शरीर, याला घेऊन आजकालचे लोक खूप चिंतेत असतात. त्यामुळे व्यायाम आणि हेल्दी फूड यावर विशेष भर दिला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 27 मार्च : आपलं आरोग्य, वजन शरीर, याला घेऊन आजकालचे लोक खूप चिंतेत असतात. त्यामुळे व्यायाम आणि हेल्दी फूड यावर विशेष भर दिला जातो. अनेकजण सकाळ सकाळ उठल्यावर व्यायाम करताना, बागेत फिरताना दिसून येतात. अनेकांचे व्यायामाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. अशातच सध्या एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यामध्ये चक्क बिबट्याच व्यायाम करताना दिसतोय.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या दिसतोय. एका झाडाखाली बिबट्या व्यायाम करताना पहायला मिळतोय. तो वेगवेगळ्या प्रकारे अंग वळवताना दिसतोय. बिबट्याचा हा व्यायामाचा व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

@TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला. व्हिडीओवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटदेखील पहायला मिळत आहेत. काही युजर्सनी लिहिले की, त्यांच्या घरातील पाळीव मांजरी देखील अशाच प्रकारची कामे करतात. सकाळी उठल्यानंतर असे केल्याने झोप आणि आळस दूर होतो. एका युजरने लिहिले की, वर्कआउट आणि दिवसभर काम करण्यापूर्वी स्ट्रेचिंग आवश्यक आहे.

दरम्यान, सामान्यतः वन्य प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ज्यामध्ये वापरकर्ते जंगली प्राण्यांची जीवनशैली पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. यामुळेच सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक वन्यजीव व्हिडिओ यूजर्सचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरतो. नुकतेच समोर आलेल्या एका बिबट्याच्या व्हिडिओमध्ये असेच काहीसे पाहायला मिळाले.

First published:
top videos

    Tags: Social media viral, Types of exercise, Video viral, Viral