मराठी बातम्या /बातम्या /Viral /एक विवाह ऐसा भी! लग्नाचा खर्च कमी करण्यासाठी जोडप्याने लढवली अनोखी शक्कल, पाहुण्यांसाठी ठेवली विचित्र अट

एक विवाह ऐसा भी! लग्नाचा खर्च कमी करण्यासाठी जोडप्याने लढवली अनोखी शक्कल, पाहुण्यांसाठी ठेवली विचित्र अट

लग्न

लग्न

आपलं लग्न छान आणि मोठं व्हावं असं प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं. ते अगदी थाटामाट करण्यासाठी भरपूर लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 23 जानेवारी : आपलं लग्न छान आणि मोठं व्हावं असं प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं. ते अगदी थाटामाट करण्यासाठी भरपूर लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. शाही सजावटीपासून ते शाही जेवनापर्यंतच सगळं शाही अंदाजात करतात. काही लोक साध्या पद्धतीने लग्न करणं पसंत करतात. लग्नाविषयीच्या अनेक हटके घटना, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पहायला मिळतात. अशातच आणखी एका हटके लग्नाची घटना समोर आली आहे. सध्या सोशल माध्यमांवर याचीच चांगलीच चर्चा रंगली आहे.

वधू-वरांची लग्नाबाबत अनेक स्वप्ने असतात. काहींना पैशाच्या जोरावर तर काहींना साधेपणाच्या जोरावर लग्न संस्मरणीय बनवायचे असते. लग्नाचे बजेट लाखात जाते हे तुम्ही ऐकले असेलच, पण मर्यादित बजेटमध्ये लग्न पार पाडण्यासाठी, बजेट कमी करण्यासाठी एका जोडप्याने अनोखी आणि अजब शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा - बापरे हे तर अजबच! नववधूवर फेकला जातो चिखल, पण का; काय आहे प्रथा?

नववधू वराने लग्नाचा खर्च कमी करण्यासाठी एक हटके युक्ती वापरल्याचं दिसून आलं. या जोडप्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या अनोख्या युक्तीमुळे त्यांचे लग्नाचे एकूण 8 लाख रुपयांचे बजेट कमी करण्यास मदत झाली. आता या जोडप्याने इतके पैसे कसे वाचवले आणि नक्की काय युक्ती आजमावली हे पाहुया.

मिरर रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील एका लग्नासाठी 32 लाखांच्या आसपास खर्च येतो. मात्र या जोडप्यांच्या समजुतदारपणामुळे हा खर्च कमी झाला. या जोडप्याने लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी पाहुण्यांसमोर एक अट ठेवली. लग्नाला येताना सोबत जेवण आणावे, असं सांगितलं. सर्व पाहुण्यांनी हे मान्य केले आणि त्यांचे लग्न अगदी कमी बजेटमध्ये पार पडले. वधू शेल्बी फेल्प्स, 26, आणि तिची जोडीदार, गॅरेट, यांनी फक्त 25 पाहुण्यांसमोर लग्न केले आणि त्यांचा मोठा दिवस शक्य तितक्या आनंददायकपणे परवडणारा बनवला.

दरम्यान, कुठे लाखात लग्ने पार पडतात आणि कुठे या जोडप्याने केवळ 49 हजार रुपये खर्च करून एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी एका सेकंड हँड दुकानातून कपडे खरेदी केले होते आणि त्यांचा एकच मित्र फोटोग्राफर म्हणून उपस्थित होता. दुसर्‍या मित्राने त्याला क्रीम-चीज आयसिंगसह गाजर केक बेक केले. तिच्या मैत्रिणींनी स्वतःसाठी लग्नाचे कपडे खरेदी केले आणि सजावटीसाठी फुले गोळा केली. त्यांनी त्यांचा दिवस मित्रांच्या मेजवानीने आणि बोनफायरने संपवला.

First published:

Tags: Marriage, Top trending, Viral, Viral news, Wedding, Wedding couple