कासिम खान, प्रतिनिधी नुह, 21 जुलै : प्रत्येक व्यक्तीला एक छंद असतो. काही लोक आपला छंद आवडीने जोपासतात. अनेकांना विविध वस्तूंचा संग्रह करायलाही आवडतं. हरियाणाच्या नुह जिल्ह्यातदेखील एक अशी व्यक्ती होती, ज्यांना तिकीटं किंवा नोटा नाही, तर चक्क टाळे जमवायला आवडायचे. नुह जिल्ह्यातील लुहिंगाकला गावात मो. हनीफ यांनी हा छंद जोपासला होता. जवळपास पाच वर्षांपूर्वी वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मात्र छंदातून आजही ते जिवंत आहेत. त्यांना वजनदार टाळे जमवायला आवडायचं. राजा-महाराजांच्या काळातही मिळणार नाहीत, अशा टाळ्यांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांच्या पश्चात हा संग्रह त्यांच्या मुलांनी जपून ठेवला आहे. त्यामुळे आजही त्यांच्या घरी लोक आवर्जून टाळे पाहण्यासाठी येतात.
मो. हनीफ यांच्या मुलाने सांगितलं की, ‘माझे वडील टाळ्यांचे शौकीन होते. 2001 साली त्यांनी दोन हजार रुपयांना जपानमध्ये बनवलेला अडीच किलो वजनाचा टाळा खरेदी केला होता. त्यानंतर नुहच्या पुन्हाना भागातून 40 किलो वजनाचा मोठा टाळा बनवून घेतला होता. असे अनेक टाळे त्यांनी जमवून ठेवले होते.’ ‘दागिन्यांवर फक्त बायकोचा अधिकार, पती दावा करू शकत नाही’, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय विशेष म्हणजे मो, हनीफ काही महिने लष्करात भरती झाले होते. परंतु ड्युटीवर असताना आईची आठवण यायची म्हणून त्यांनी लष्कराची नोकरी सोडली. घरी येऊन ते शेती करू लागले. त्यातूनच कुटुंबीयांचं पालनपोषण केलं. त्यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांनी आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत टाळे विकू नका, असं सांगितलं होतं. येणाऱ्या पिढ्यांनीही हे ऐतिहासिक टाळे पाहावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार मुलांनी टाळे आणि पर्यायाने वडिलांचा छंद जपून ठेवला आहे.