जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शेतकऱ्याने केला 'चमत्कार'! टरबूजालाच लागलं खरबूज; या नव्या फळाला तुम्ही काय म्हणाल?

शेतकऱ्याने केला 'चमत्कार'! टरबूजालाच लागलं खरबूज; या नव्या फळाला तुम्ही काय म्हणाल?

टरबजू-खरबूज एकत्र (फोटो: Weibo via Odditycentral)

टरबजू-खरबूज एकत्र (फोटो: Weibo via Odditycentral)

एकच फळ खाऊन टरबूज आणि खरबूज दोघांची चव चाखता येणार आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बीजिंग, 22 जून : उन्हाळ्यात तुम्ही टरबूज, खरबूज खूप खाल्लं असेल. कुणाला टरबूज आवडतं तर कुणाला खरबूज. मग एकाच घरात अशा वेगवेगळ्या आवडी असतील तर मग ही दोन्ही फळं न्यावी लागतात. पण आता चक्क खरबूज आणि टरबूज एकत्रच खाता येईल. एका शेतकऱ्याने असा चमत्कार केला की खरबूजाला टरबूज लागलं आहे. टरबूज आणि खरबूज एकत्र होऊन एक नवं फळ तयार झालं आहे. काही शेतकरी शेतात काही ना काही नवे प्रयोग करत असतात. अशाच एका शेतकऱ्याने केलेला हा अनोखा प्रयोग. दोन फळं एकत्र करून त्याने एक नवं संकरित फळ तयार केलं आहे. हे फळ वरून खरबूज आणि खालून टरबूजासारखं आहे. जेव्हा या शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या हायब्रीड टरबूजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा ते पाहून सर्वजण थक्क झाले. शेतकऱ्याने सांगितलं की, त्याने खरबूजाच्या बियांचे टरबूजच्या बियांमध्ये प्रत्यारोपण करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. पण आता त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. त्याने टरबूज आणि खरबूज अशा एकत्र फळाचं उत्पादन केलं आहे. आईच्या गावात अन बाराच्या भावात! तोंड-डोळे-कान-नाक असलेला ‘आंबा’; विश्वास बसत नाही तर VIDEO पाहा प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी म्हणाला, शेतात घेतलेल्या पिकांपैकी अर्धे टरबूज आणि अर्धे खरबूज अशी काही फळे आहेत. बहुतेक 10 टक्के टरबूज आणि 90 टक्के खरबूज आहेत. हे पीक वाढवण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचं तो म्हणाला. माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये फळ खूपच लहान आहे, आता मोठे व्हायला अजून वेळ लागेल. आता हे फळ नेमकं कुठे उत्पादित करण्यात आलं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, चीनच्या अनहुई प्रांतातील फुयांगमधील 40 वर्षीय शेतकऱ्याने ही कमाल केली आहे. चिनी प्रसारमाध्यमांमध्ये त्याला मिस्टर ए या नावाने ओळख मिळत आहे. Yellow Watermelon : तुम्ही कधी पिवळं कलिंगड खाल्लंय? चवीसोबत फायदेही आहेत जबरदस्त.. हे फळ चीनमध्ये उत्पादित करण्यात आलं असलं, तरी हे फळ पाहिल्यानंतर तुम्ही याला काय म्हणाल, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात