हे कलिंगड लाल ऐवजी पिवळे असण्याचे कारण म्हणजे, या कलिंगडामध्ये 'लायकोपीन' नावाच्या घटकाची कमतरता असते. लाइकोपीन हेच एंझाइम भारतीय प्रजातीच्या टरबूजांनाही लाल रंग देते.
परंतु लाइकोपीनऐवजी आफ्रिकन कलिंगडामध्ये फारच कमी प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि काही खनिजे आढळतात, ज्यामुळे ते अधिक गोड आणि पिवळे बनते. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटीनॉइड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि डोळ्यांची दृष्टीही सुधारते. तसेच यामध्ये भरपूर पाणी आणि फायबर असते, पंचक्रिया निरोगी ठेवते आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या अल्सरपासून वाचवते.
पिवळ्या कलिंगडामध्ये अनेक अशी संयुगे असतात, जी वजन कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच पिवळे कलिंगड व्हिटॅमिन बी 6 मध्ये समृद्ध असते, जे अॅन्टीबॉडीजचे उत्पादन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
पिवळ्या टरबूजच्या पांढऱ्या भागात सिटुलीन हे अमीनो अॅसिड भरपूर असते, जे रक्तदाब पातळी राखण्यास मदत करते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सिटुलीन रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत करते, ज्यामुळे स्नायूंचा थकवा दूर होऊ शकतो.
पिवळे कलिंगड तुम्हाला हायड्रेटेड ठेऊन किडनी स्टोनचा धोका कमी करते. यामध्ये मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक खनिज असतात. तसेच पिवळ्या कलिंगडामध्ये असलेले कॅरोटीनोइड्स कर्करोगाशी लढणारे प्रभावी संयुग आहे, असेही सिद्ध झालेले आहे.