मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking video! Hair style च्या नादात जीवाशी खेळ; पठ्ठ्याने चक्क केसच पेटवले

Shocking video! Hair style च्या नादात जीवाशी खेळ; पठ्ठ्याने चक्क केसच पेटवले

हातात जळतं लाकूड घेऊन हेअर स्टाईल करायला गेला आणि...

हातात जळतं लाकूड घेऊन हेअर स्टाईल करायला गेला आणि...

हातात जळतं लाकूड घेऊन हेअर स्टाईल करायला गेला आणि...

मुंबई, 01 डिसेंबर : केस पेटवून हेअरस्टाईल (Hair style video) केल्याचा व्हिडीओ तुम्ही कधी ना कधी सोशल मीडियावर (Social media) पाहिला असेल. काही हेअर स्टायलिस्ट अशी हेअर स्टाईल करताना दिसतात (Hair style with fire video). पण हे हेअर स्टायलिस्ट प्रोफेशनल असतात आणि त्यांनी याचं रितसर प्रशिक्षण घेतलेलं असतं. पण एका व्यक्तीने तर अशी हेअरस्टाईल स्वतःच करण्याचा प्रयत्न केला आहे.

आगीच्या मदतीने हेअर स्टाईल करणाऱ्या या व्यक्तीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. जो पाहून प्रत्येक जण हैराण झाला आहे. हेअर स्टाईल करण्याच्या नादात ही व्यक्ती आग हातात घेऊन स्वतःच्याच जीवाशी खेळताना दिसते आहे. व्हिडीओ पाहून आपल्याही धडकी भरते.

व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती एका खुर्चीत आरामात बसली आहे. तिने मांडीवर आरसा ठेवला आहे आणि एका हातात जळतं लाकूड घेतलं आहे. दुसरा हात केसांवर फिरवत जळतं लाकूडही केसांवरून फिरवते आहेत. ही व्यक्ती दुसऱ्या हाताने केस कुठे कुठे वाढले आहेत ते पाहते आणि तिथं हे जळतं लाकू़ड नेते. आगीसमोर केस नेताच काय होतं हे तुम्हाला माहिती असेलच. अगदी तसेच या व्यक्तीचे केसही दिसून लागले आहेत.

हे वाचा -  लग्नात सप्तपदीआधी नवरीबाईची भलतीच डिमांड; Wedding video पाहून डोक्याला लावाल हात

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा शॉकिंग व्हिडीओ पोस्ट केला आहे. आगीसोबत खेळणं, आगीने हेअरस्टाईलिंग असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. तसंच ईशान्य भारतातील कुठल्या तरी ठिकाणावरील हा व्हिडीओ असावा, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Fire, Shocking viral video, Viral, Viral videos