मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नात मंत्रोच्चार करता करता दमले गुरुजी; तर वधु-वरांनी मंडपात केला प्रताप, Video Viral

लग्नात मंत्रोच्चार करता करता दमले गुरुजी; तर वधु-वरांनी मंडपात केला प्रताप, Video Viral

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर नेहमी लग्नाचे मजेशीर व्हिडीओ (Wedding Funny Video) व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा आपल्याला हसू आवरत नाही. अशात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून हसून हसून पोट दुखेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका लग्नातील आहे. ज्यात लग्नादरम्यान मंडपात अग्नीच्या समोर बसलेले वर-वधू पाण्याची बाटली घेऊन खेळत असताना दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अत्यंत जलद गतीने व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लग्नादरम्यान मंत्रोच्चार करता करता गुरुजी दमले होते. त्यानंतर ते थोडा आराम करीत होते. तेथे बसलेल्या वर-वधुदेखील रिकामा वेळ असल्यामुळे टाइमपास करू लागले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर-वधू लग्नाच्या मंडपात बसले आहेत आणि जवळपास पाहुणेही बसले आहेत. नवरा-नवरी पाण्याच्या एका बाटलीशी खेळत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वारंवार पाहिला जात आहे.

हे ही वाचा-तू काळजी करू नको, आम्ही...'; आई Covid पॉझिटिव्ह, मुलांनी लिहिलं हृदयस्पर्शी पत्र

या व्हिडीओवर लोक मजेशीर कमेंट्स करीत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 68 हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. एका यूजरने कमेंट करीत लिहिलं आहे की, बस आता हेच बाकी होतं.

First published:
top videos

    Tags: Marriage, Viral video.