मराठी बातम्या /बातम्या /Viral /अपहरण होण्यापेक्षा हात-पाय मोडलेला बरा; गुरुग्राममधील तरुणीची धावत्या रिक्षातून उडी, ट्विटरवर सांगितली आपबीती

अपहरण होण्यापेक्षा हात-पाय मोडलेला बरा; गुरुग्राममधील तरुणीची धावत्या रिक्षातून उडी, ट्विटरवर सांगितली आपबीती

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

महिला दिवसाही सुरक्षित (safety of Women) नसल्याची घटना नुकतीच गुरुग्राम शहरात घडली आहे. या ठिकाणी एका मुलीले दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाने केला आहे. घाबरलेल्या मुलीने चालू रिक्षातून उडी मारुन कसाबसा आपला जीव वाचवला.

पुढे वाचा ...

    गुरुग्राम, 22 डिसेंबर : आपल्या देशामध्ये महिला सुरक्षेचा (safety of Women) मुद्दा कायम चर्चेत राहतो. गाव असो किंवा शहर देशातील महिला आणि मुली पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुरावे देणाऱ्या अनेक घटना सतत घडत असतात. राजधानी दिल्ली (Delhi) तर महिलांसाठी सर्वात असुरक्षित ठिकाण मानलं जातं. ही गोष्ट सिद्ध करणारी एक घटना दिल्लीलगत असलेल्या गुरुग्राममध्ये (Gurugram) घडली. गुरुग्राममधील सेक्टर 22 मध्ये राहणाऱ्या एका तरुणीचं रिक्षा ड्रायव्हरनं (Rickshaw driver) अपहरण (Kidnapping) करण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी या तरुणीनं धावत्या रिक्षेतून उडी मारली. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर याबाबत तरुणीनं माहिती दिली आहे. आपल्या घरापासून अवघ्या सात मिनिटांच्या अंतरावर असताना ही घटना घडल्याचं तरुणीचं म्हणणं आहे.

    ट्विटर प्रोफाइलनुसार, या तरुणीचं नाव निष्ठा असून ती कम्युनिकेशन्स स्पेशालिस्ट (Communications Specialist) म्हणून काम करते. आपल्याला घरी नेणाऱ्या ऑटो रिक्षा ड्रायव्हरनं जाणीवपूर्वक चुकीचा टर्न घेतला आणि चुकीच्या रस्त्यावर रिक्षा नेली. याबाबत त्याला विचारणा केली असता त्यानं दुर्लक्ष केलं, असा आरोप निष्ठानं केला आहे.

    VIDEO:'प्रियकराला जळवायला लग्न केलं, पण तो आलाच नाही आणि..'; नवरीने मांडली व्यथा

    आपल्या सोबत घडलेली घटना या तरुणीनं ट्विटरवर सविस्तरपणे सांगितली आहे. 'काल माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त भीतीदायक दिवस होता. माझं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मला माहिती नाही नेमका तो काय प्रकार होता. मात्र, ते आठवलं की भीतीनं अंगावर शहारे येतात,' असं ट्विट निष्ठानं केलं आहे. तिने दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घरी जाण्यासाठी गुरुग्राममधील सेक्टर 22 जवळील एका बाजारातून ऑटो पकडली. तिथून तिचं घर अवघं सात मिनिटांच्या अंतरावर होतं. तिनं रिक्षा ड्रायव्हरला आपल्याकडं कॅश नसल्यानं पेटीएमनं पेमेंट (Paytm Payment) करू असं देखील सांगितलं. रिक्षा ड्रायव्हरनं होकार दिल्यानंतर ती रिक्षेमध्ये बसली. रिक्षामध्ये उबरचे स्टीकर लावलेलं होतं आणि मोठ्या आवाजात भजनही सुरू होतं. त्यावरून तो उबरसाठीदेखील काम करत असावा, असा अंदाज निष्ठानं व्यक्त केला.

    हा प्रकार समोर आल्यानंतर गुरुग्राममधील पालम विहारचे (Palam Vihar) पोलीस अधिकारी जितेंद्र यादव यांनी ऑटो रिक्षा ड्राइव्हरचा शोध घेण्याचं आश्वासन दिलं आहे. घाबरल्यामुळे निष्ठाला रिक्षाचा नंबर नोट करता आला नाही. त्यामुळे पोलीस सीसीटीव्ही (CCTV) फुटेजचा आधार घेतील, अशी शक्यता आहे.

    अ‍ॅडल्ट स्टारकडे चाहत्याने केली विचित्र मागणी, जाणूनच लावाल डोक्याला हात

    या घटनेमुळं पुन्हा एकदा भारतातील शहरांमधील महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. दिवसा देखील महिलांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याचं यामुळं लक्षात आलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Women, Women safety