मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Wrong side ने सायकल चालवली म्हणून महिला पोलिसाने अडवलं, आणि... थेट कोर्टात झाली रवानगी

Wrong side ने सायकल चालवली म्हणून महिला पोलिसाने अडवलं, आणि... थेट कोर्टात झाली रवानगी

हा विचित्र प्रकार गुजरातमधील सुरत येथे घडला आहे.

हा विचित्र प्रकार गुजरातमधील सुरत येथे घडला आहे.

हा विचित्र प्रकार गुजरातमधील सुरत येथे घडला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

सूरत, 28 मे : गुजरातच्या (Gujarat) सूरत शहरात वाहतुकीच्या नियमाबाबत एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यात चुकीच्या दिशेने सायकल चालविणाऱ्या 47 वर्षांच्या एका व्यक्तीची मोटर वाहन अधिनियमातंर्गत चालान कापण्यात आलं आहे. या चालानची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेमक्या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी सायकल चालविणाऱ्याविरोधात मोटर वाहन अधिनियमांतर्गत कशी काय कारवाई केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Gujrat : A man riding a bicycle on the wrong side was sent to court )

राजबहाद्दुर यादव नावाची एक व्यक्ती गुरुवारी सकाळी सचिन जीआयडीसी भागात रस्त्यावरुन जात होती. तेव्हा एक महिला कॉन्स्टेबल कोमल डांगरने त्याला थांबवलं. आणि चुकीच्या दिशेने सायकल चालविण्याबाबत मोटर वाहन अधिनियमाअंतर्गत चालान जारी केलं. आता यादवला न्यायलयीन मेजिस्ट्रेटच्या समोर हजर व्हावं लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणात सूरत शहरातील वाहतूक पोलीस उपायुक्त प्रशांत सुम्बे यांनी सांगितलं की, महिला कॉन्स्टेबलला सायकल चालकाला हे सांगायला हवं होतं की, हे चालान मोटर वाहन अधिनियमाऐवजी गुजरात पोलीस अधिनियमाअंतर्गत जारी करण्यात आलं आहे.

हे ही वाचा-शातिर चोर! चोरी करुन करायचे टक्कल, मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सुम्बेने शुक्रवारी सांगितलं की, एका सायकल चालकाविरोधात मोटर वाहन अधिनियमांतर्गत नाही तर गुजरात पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई करता येऊ शकते. सायकल चालकाने या प्रकरणात सांगितलं की, मी माझी चूक मान्य करतो. या प्रकरणात मी कोर्टासमोर हजर होईल व कोर्ट जी शिक्षा देईल ती मला मान्य आहे.

 

 

First published:

Tags: Traffic department