मुंबई, 28 मे: मुंबई पोलिसांनी तीन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहे. आरे (Aarey Police) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून जवळपास लाखांचा ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे, हे आरोपी आपली चोरी पकडली जाऊ नये आणि पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी टक्कल (Bald Thieves) करायचे.
चोरी केल्यानंतर हे आरोपी फरार होऊन टक्कल करायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 4 मोटर सायकलसह 14 मोबाईल जप्त केलेत. याची एकूण पोलिसांनी जवळपास 3 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या तिन्ही आरोपींवर मुंबईतल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
24 मे रोजी आरे पोलीस गोरेगाव पूर्व विरवानी इंडस्ट्री येथे पेट्रोलिंग करत होते. या भागात अनेकदा चोरीच्या घटना घडत असतात. पोलीस पेट्रोलिंग करत असताना दोन आरोपी संशयास्पद रित्या बाइक घेऊन जाताना दिसले. पोलीस जेव्हा त्यांचा पाठलाग करु लागली त्यावेळी दोघं जण पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडलं.
हेही वाचा- खासदार संभाजीराजे लवकरच करणार भाजपला रामराम?
दोघांना ताब्यात घेतल्यानंतर समजलं की, हे दोघंही रेकॉर्डर स्नॅचर आहे. चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 14 मोबाईल आणि 4 अॅक्टिव्हा डिओ बाइक जप्त करण्यात आली आहेत.
चोरी करुन करायचे टक्कल, आरे पोलिसांनी केली मोठी कारवाई #mumbai #mumbaicrime pic.twitter.com/qMKcrwnEbV
— News18Lokmat (@News18lokmat) May 28, 2021
आमचा आणखी एक साथीदार असून तो गणेश नगरमध्ये राहतो, असं अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं. या सगळ्याच्या मागे तो मास्टरमाइंड असल्याचंही त्यांनी पोलिसांना म्हटलं. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याही आरोपीला अटक केली. अब्दुल हजरत अली शेख (21), आरिफ सत्तार खटिक (20), राघव जागेश्वर चौहान (19) अशी आरोपींची नावं आहे. हे तिघंही कांदिवली पश्चिम येथे राहणारे आहेत.
हे तिन्ही आरोपी बाइकवरुन इन्फिनटी मॉल, गोरेगाव, बोरिवली, समता नगर, मरिन ड्राईव्ह या भागात रस्त्यावरुन बॅग नाहीतर मोबाईल हिसकावून फरार व्हायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा- ''नाहीतर पुन्हा आंदोलन सुरु करेन'', प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा
आरे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांनी सांगितलं की, आरे पोलीस डिटेक्शन टीमनं या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 4 बाइक, 14 मोबाईल जप्त केलेत. ज्याची किंमत जवळपास 3 लाख 20 हजार आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai crime branch, Mumbai police