Home /News /viral /

काय म्हणावं याला! 135 मुलांचा बाप, 125 नातवंडांचा आजोबा; 28 बायकांसमोर बांधली 37 वी लगीनगाठ

काय म्हणावं याला! 135 मुलांचा बाप, 125 नातवंडांचा आजोबा; 28 बायकांसमोर बांधली 37 वी लगीनगाठ

आपल्या पत्नी आणि शेकडो मुलं-नातवंडांसमोर वृद्ध व्यक्तीने चक्क 37 वं लग्न केलं आहे.

    मुंबई, 11 मे : पूर्वी राजा-महाराजांच्या एकाच वेळी कित्येक पत्नी असल्याच्या तुम्हााल माहिती असेल. त्यावेळी हे सामान्य होतं. पण आता एकापेक्षा अधिक पत्नींना सोबत ठेवण्याचा विचारही कुणी करणार नाही. तरी काही लोक असे आहेत ज्यांना अशी हौस आहे. काही दिवसांपूर्वीच एकाच वेळी 9 महिलांसोबत लग्न करणारा असाच एक तरुण चर्चेत आला होता. पण एका वृद्धाने मात्र या तरुणालाही मागे टाकलं आहे. हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नी आणि शेकडो मुलं-नातवंडांसमोर चक्क 37 वं लग्न केलं आहे (Old Man Married 37th Time). वृद्ध व्यक्तीच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या 28 पत्नी, 135 मुलं आणि 125 नातवंडं आहेत. या सर्वांसमोर त्याने 37 वी लग्नगाठ बांधली आहे. हा व्हिडीओ पाहून रुपिन शर्माही हैराण झाले आहेत. त्यांनी या व्यक्तीला हिंमतवाला म्हटलं आहे. व्हिडीओत पाहू शकता एक नवरी नटूनथटून बसली आहे. तिच्या चेहऱ्यावरील घुंघट हटवला जातो आणि त्यानंतर तिला एका वृद्ध व्यक्तीसोबत बसवलं जातं. आता ही व्यक्ती या तरुणीचे आजोबा किंवा वडील असावे असे वाटतील. पण हाच तिचा होणारा नवरा आहे. हे वाचा - बाईकला धडक देणाऱ्या महिला कार चालकासोबत तरुणाचं शॉकिंग कृत्य; हैराण करणारा VIDEO लग्नात तरुणी शांत आहे पण लग्नाला आलेली मंडळी मात्र उत्साही दिसत आहेत. ही सर्व मंडळी नवरदेवाकडील आहेत. त्यापैकी काही नवरदेवाच्या पत्नी आहेत, काही मुलं आणि काही नातवंडं आहेत. ते या लग्नात आनंदाने सहभागी झाले आहेत. आपले फोटो आणि व्हिडीओ काढत आहेत. इतकंच नव्हे तर नववधूचं आपल्या कुटुंबात टाळ्या वाजवून स्वागतही करताना दिसत आहे. हे वाचा - म्हणे, 'लल्ला, रसगुल्ला...', मुलींना वैतागलेल्या मुलांची मुख्याध्यापकांकडे तक्रार; Funny Letter Viral हा व्हिडीओ कुठला आहे माहिती नाही. पण तसा हा जुना आहे. कारण याआधीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. आमच्यान एक सांभाळणं मुश्किल आहे, कुणी सिंगल हा व्हिडीओ पाहिल तर त्याचा जीवच जाईल, अशा मजेशीर कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Marriage, Viral, Viral videos, Wedding

    पुढील बातम्या