इस्लामाबाद, 15 ऑक्टोबर: भारतीय संस्कृतीनुसार, लग्नात विविध रीती-रिवाज आणि विधी पार पाडले जातात. पाकिस्तानात देखील लग्नातील काही विधी आणि रिती-रिवाज भारतीयांप्रमाणेच आहेत. लग्नात नवरदेवाची चप्पल लवपणे किंवा चप्पल चोरणे हा भारतीय लग्नातील सर्वात मोठा रिवाज आहे. लग्नात अत्यंत मजेदार पद्धतीनं हा विधी पार पाडला जातो. यादिवशी दाजी आणि मेहुण्यांमध्ये मोठी खुन्नस पाहायला मिळते. असाच एक लग्नाचा व्हिडीओ (Marriage viral video) समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुणी आपल्या दाजीचे पाय पकडून बसली आहे.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरणार हा व्हिडीओ पाकिस्तानातील एका लग्नाचा (Pakistani marriage video) आहे. ज्यामध्ये एक तरुणीने आपल्या दाजीची चप्पल काढून घेतली आहे. त्यानंतर तिने थेट नवरदेवाचे पाय पकडून त्याच्याकडे शगुनच्या पैशांची मागणी केली आहे. नवरदेवाने बराच वेळ तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिने नवरदेवाला काही सोडलं नाही.
हेही वाचा-बेडखालून येत होते विचित्र आवाज,जगातील सर्वात विषारी किटकाला पाहून हादरला व्यक्ती
शेवटी नवरदेवाने हार मानून काही रक्कम आपल्या मेहुणीला देऊ केली. पण मेहुणीने तब्बल दोन लाख पाकिस्तानी रुपयांची मागणी केली. ही रक्कम ऐकून नवरदेवाने काही कमी पैसे देऊन तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तिने काही ऐकून घेतलं नाही. दरम्यान अनेक नातेवाईकांनी देखील येथे गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.
मेहुणीने कमी पैसे घ्यायला तयार नसल्याने नवरदेव भर मंडपात उठून उभा राहतो आणि नवरीच्या हाताला धरून तिला मंडपातून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे जमलेले पाहुण्यांनी नवरदेवाचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. त्यामुळे नवरदेव पुन्हा आपल्या जागी शांतेत बसावं लागलं आहे. संबंधित लग्नातील हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून अनेक वापरकर्ते यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.