मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे बापरे! लग्नात सोशल डिस्टन्सिंसाठी नवरदेवाची भलतीच शक्कल, Funny Video Viral

अरे बापरे! लग्नात सोशल डिस्टन्सिंसाठी नवरदेवाची भलतीच शक्कल, Funny Video Viral

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरदेवाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी (Haldi Ceremony) अजब शक्कल लढवण्यात आली आहे. जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) पालन व्हावं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 29 मे : देशभरात कोरोना विषाणूनं (Coronavirus) थैमान घातलं आहे. त्यामुळे, लोकांना घरामध्येच बंद राहावं लागत आहे. कोरोनापासून बचावासाठी लोकांनी घरातून बाहेर पडणंच बंद केलं आहे. देशातील बहुतेक राज्यांमध्ये लॉकडाऊनही (Lockdown) करण्यात आलं आहे. लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार आणि इतर कार्यक्रमांसाठीही विविध नियम लागू करण्यात आले आहेत. याचं पालन करणं सर्वांसाठी अनिवार्य आहे. अशात ज्यांच्या घरी लग्नसमारंभ आहे, ते लोकही जास्त लोकांना बोलवू शकत नाहीत. याच काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral on Social Media) होत आहेत, ज्यात लोक लग्नासाठीही वेगवेगळी शक्कल लढवत आहेत.

सध्या सोशल मीडियावर असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरदेवाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी (Haldi Ceremony) अजब शक्कल लढवण्यात आली आहे. जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) पालनही व्हावं आणि हळदी समारंभही व्यवस्थित पार पडावा. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी भीषम सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी याला कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं, की आपात्कालीन स्थितीमध्येही आपल्या देशात यावरही शक्कल लढवून सगळी योग्य व्यवस्था करणारे लोक आढळतात. कोरोना असला म्हणून काय झालं? हळदीचा कार्यक्रम होणारच आणि तोदेखील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करत आहेत. तसंच यावर भरपूर कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत वीस हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये असं दिसतं, की नवरदेव बसला आहे आणि भिंतींना रंग देण्याच्या लांब हँडल असणाऱ्या ब्रशनं एक महिला दूर उभा राहून नवरदेवाला हळद लावत आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरनं लिहिलं, इच्छा असे तिथे मार्ग दिसे. तर, दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, असं वाटतंय, की त्याला रंगच दिला जात आहे.

First published:

Tags: Funny video, Social distancing, Social media viral