वॉशिंग्टन, 23 डिसेंबर : केस कापायचे (Hair cutting video) म्हटलं की आपण सलूनमध्ये जातो. जिथं एका खुर्चीवर आरामात बसतो आणि बार्बर कैची किंवा रेझरच्या मदतीने आपला हेअरकट करतो. पण कधी विचार केला आहे का की अंतराळात इतके दिवस राहणारे अंतराळवीर केस कसे कापत असतील (Hair cutting in space video) . स्पेसमधील हेअर कटिंगचा एक व्हिडीओ (Social media viral video) समोर आला आहे (Space hair cutting video). इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील (International Space Station) सलूनचा (Space hair saloon video) व्हिडीओ तुम्ही पाहायचा हवा. अंतराळवीर मॅथियास मॉरर (Matthias Maurer) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मॅथियास आपला साथीदार राजा चारीकडून केस कापून घेत आहे.
Step into the space salon where barber @astro_raja is a man of many talents 🚀💈💇♂️ Because none of us want hair in our eyes, or – even worse – the @Space_Station systems, our hair clippers come with a vacuum attached. Five stars for this space stylist's service ⭐️😉 #CosmicKiss pic.twitter.com/dDsXHaSgG5
— Matthias Maurer (@astro_matthias) December 19, 2021
व्हिडीओत पाहू शकता मॉरर अंतराळयानाला पकडून आपल्या गुडघ्यावर बसला आहे. तर राजा चारी उभं राहून त्याचे केस कापत आहे. त्याच्या हातात एक लांबलचक पाइप दिसतो आहे. हा पाईप म्हणजे व्हॅक्युमचा पाइप आहे. ज्याला ट्रिमर जोडण्यात आलं आहे आणि त्याने केस कापले जात आहेत. हे वाचा - …अन् आपोआपच हवेत उडू लागला Pizza; पार्टीचा हा भन्नाट VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक मॅथियास मॉरर यांनी या व्हिडीओसोबत मजेशीर ट्विटही केलं आहे, “अंतराळातील सलून पाहा. @astro_raja मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आहे. आमच्यापैकी कुणालाही आपल्या डोळ्यांवर येण्याइतके किंवा त्यापेक्षा जास्त केस नको आहेत. @Space_Station सिस्टममध्ये आमच्या खुर्चीसोबतच व्हॅक्युम जोडलेला होता. अंतराळातील स्टाइलिस्टच्या सेवेसाठी फाइव्ह स्टार”, असं ट्विटमध्ये तो म्हणाला. हे वाचा - Kick मारताच चालते Jeep; मराठमोळ्या व्यक्तीचा आविष्कार पाहून Anand Mahindra सुद्धा झाले इम्प्रेस याआधी अंतराळात ब्रश करताना, केस धुतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तसंच अंतराळवीर पिझ्झा पार्टी आणि वर्कआऊट करतानाही दिसले होते.