मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरी आयुष्यभर लक्षात ठेवेल लग्नाचा 'तो' क्षण, नवऱ्याने सगळ्यांसमोर....,पाहा Video

नवरी आयुष्यभर लक्षात ठेवेल लग्नाचा 'तो' क्षण, नवऱ्याने सगळ्यांसमोर....,पाहा Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सध्या लग्नसराई सुरु असून सगळीकडे लग्नांची धुम दिसत आहे. लग्न म्हटलं की सर्वांचे लक्ष नववधू आणि वर मुलावर असतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 3 जानेवारी : सध्या लग्नसराई सुरु असून सगळीकडे लग्नांची धुम दिसत आहे. लग्न म्हटलं की सर्वांचे लक्ष नववधू आणि वर मुलावर असतं. त्यांचे फोटो, उखाणे, एकमेंकांना उचलणं, असे अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत असतात. यामध्ये अनेक फनी, धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ समोर येत असतात. अशातच नवरा नवरीचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक नवरा नवरीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, नवरदेवाला नवरी मुलीला उचलण्यासाठी त्याचे मित्र आग्रह करत आहेत. मित्रांच्या आग्रहामुळे अखेर नवरा मुलगी नवरी मुलीला उचलतो. मात्र पुढे भलतंच घडतं. नवरा मुलाला नवरी मुलीचं वजन झेपत नाही आणि दोघेही खाली कोसळतात.

नवरा-नवरीसाठी नवीन आणि हटके लग्नाचे मराठी उखाणे 

पहिल्यांदा नवरदेव नवरीला उचलण्यासाठी दोन ती वेळा प्रयत्न करताना दिसतो मात्र नंतरही त्याला ते जमत नाही. व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी दोघेही एका गोल आकाराच्या छोट्या स्टेजवर वरमाला विधीसाठी उभे राहिलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या पोस्टवर अनेक कमेंट येत आहेत.

हिंमतीनुसार वागा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'लोकांच्या म्हणण्यावर चालू नका. तुमच्या क्षमतेनुसार काम करा, लोक तुमच्या चुकांवर हसायला तयार आहेत' अवघ्या 30 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 9 हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. कमेंट करत नेटकरी नवरदेव आणि नवरीची चांगलीच खिल्ली उडवत आहे.

First published:

Tags: Marriage, Viral news, Viral videos, Wedding, Wedding couple