बिहार : आपल्या लग्नाचं स्वप्न प्रत्येक मुलगा-मुलगी पाहात असतं. आपलं लग्न असं व्हावं की ते सगळ्यांच्याच लक्षात राहावं असं सगळ्यांना वाटत असतं, त्यासाठी लोक पाण्यासारखा पैसा देखील खर्च करतात. पण हे स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटेवर असतानाच एखाद्याने जोडीदारच गमावला तर? या गोष्टीचा विचार करणं देखील कठीण आहे. पण ही घटना खरोखर घडली आहे. सीतामढी जिल्ह्यातील सोनबरसा येथे लग्नाच्या दिवशीच स्टेजवर नवरदेवाचा मृत्यू झाला, या बातमीने संपूर्ण गाव हादरलं आहे. ज्यानंतर ही बातमी इंटरनेटवर देखील वाऱ्यासारखी पसरली आहे. Video : दारूच्या नशेत सापाला Kiss, कोब्रासोबत खेळण्याचा परिणाम थरकाप उडवणारा खरे तर हे संपूर्ण प्रकरण सोनबरसा ब्लॉकमधील इंदरवा गावाशी संबंधित आहे. परिहार ब्लॉकच्या मनीथर गावातून बुधवारी रात्री सुरेंद्र कुमार यांची वरात आली होती. वरात आल्यानंतर विवाह सोहळा सुरू होता. त्यावेळेला महिला पारंपारिक मंगल गीते गात होत्या. तेव्हा हा सगळा आनंद दु:खात बदलला. खरंतर नवरदेवाच्या एन्ट्रीनंतर वरमाला कार्यक्रम सुरू झाला. तेव्हा वधू-वर वरमालासाठी स्टेजवर पोहोचले. वरमालानंतर अचानक नवरदेव चक्कर येऊन स्टेजवर पडला. त्यानंतर नवरदेवाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. ‘वराला त्रास होत होता- डीजेचा आवाज कमी होत नव्हता’ मृताचा (नवरदेवाचा) मोठा भाऊ जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, घरातून मिरवणूक निघाली होती. तोपर्यंत सुरेंद्र बरा होता. पण, जेव्हा वरात नववधूच्या दरवाजात आली तेव्हा नवरदेवाला आवाजाचा त्रास होऊ लागला, त्याने आवाज कमी करण्यासाठी देखील सांगितले होते. काही वेळाने देखील सुरेंद्र आवाज कमी करायला सांगत होता. पण, कोणीही लक्ष दिले नाही. लग्न घर आहे इतका आवाज तर असेलच, असं नवरदेवाला सांगण्यात आलं. ज्यानंतर अचानक नवरदेवाला जास्त त्रास झाला, ज्यानंतर, त्याचा मृत्यू झाला.
सुरेंद्रचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्याचे शवविच्छेदन केल्यानंतरच सगळा प्रकार उघड होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि या प्रकरणात पोलीस संपूर्ण तपास करत आहेत.

)







