चाणाक्ष वधूनं फोडलं नवरदेवाचं बिंग; वृत्तपत्रामुळं भर मांडवात मोडलं लग्न

चाणाक्ष वधूनं फोडलं नवरदेवाचं बिंग; वृत्तपत्रामुळं भर मांडवात मोडलं लग्न

अचानक झालेल्या या कृतीने तो हडबडला आणि त्याचं पितळ उघडं पडलं.

  • Share this:

मुंबई 23 जून: पूर्वीच्या काळी तरुण मुलींना फसवून एखाद्या वयस्कर पुरुषाशी किंवा काही तरी दोष असलेल्या पुरुषाशी लग्न लावून देण्याचे प्रकार अनेकदा घडायचे. त्या वेळच्या सामाजिक वातावरणामुळे अशा अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची किंवा त्याविरोधात लढा देण्याची हिंमत कोणतीही मुलगी करू शकायची नाही. आताच्या काळात मात्र मुलींमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याने असे फसवणुकीचे प्रकार कमी झालेत. फसवणूक झालीच तर त्याविरोधात मुली स्वतःच दंड थोपटून उभ्या राहू लागल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घडली. 'जागरण'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

21 जून रोजी जमालीपूर गावातल्या एका तरुणीचं महाराजपूर नावाच्या गावातल्या तरुणाशी लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न (Marriage) अगदी धूमधडाक्यात करून देण्यासाठी मुलीचे वडील आणि सगळ्याच नातेवाईकांनी मोठी तयारी केली होती. नवऱ्या मुलाची वरात आली. सुरुवातीचे विधी पार पडले आणि वधू-वरांनी परस्परांच्या गळात वरमाला घालण्याचा प्रसंग जवळ येऊन ठेपला. तेवढ्यातच वधू पक्षाकडच्या (Bride) नातेवाईकांचं वराच्या (Groom) हालचालींवर लक्ष गेलं. त्याच्या एकंदर वागण्यावरून त्याच्या नजरेत काही समस्या असल्याची शंका त्यांना आली. आणि वधूही चाणाक्ष होती. काही तरी गडबड असल्याचं तिच्याही नजरेनं टिपलं होतं. साजशृंगार करून, मेंदी लावून वरमाला घालण्यासाठी सज्ज असलेल्या वधूने अचानक वृत्तपत्र मागवलं. तिने हे कशासाठी केलंय, हे पटकन कोणाच्या लक्षात आलं नाही; पण वृत्तपत्र (Newspaper) आणल्यावर तिने ते वराला वाचायला सांगितलं. अचानक झालेल्या या कृतीने तो हडबडला आणि त्याचं पितळ उघडं पडलं. त्याला हेडिंगही वाचता येत नव्हतं. कारण त्याची दृष्टी अधू होती, हे या अचानक केलेल्या वरपरीक्षेवरून सिद्ध झालं.

पाण्यात बुडणाऱ्या 'तरुणी'ला वाचवण्यासाठी धावली रेस्क्यु टीम; पण बाहेर काढल्यानंतर निघाली Sex Doll, PHOTO व्हायरल

वराच्या डोळ्यांत असलेली ही समस्या त्याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी लपवली होती; पण वधूच्या चाणाक्षपणामुळे ती समस्या वेळेवर लक्षात आली. वधू पक्षातल्या लोकांनी वर पक्षातल्या लोकांना चांगलेच बोल सुनावले. ही लपाछपी का केली, ही फसवणूक नव्हे काय, अशा प्रश्नांची सरबत्ती वर पक्षावर झाली आणि ते काहीही बोलू शकले नाहीत. मंगळवारपर्यंत त्यांच्यात समझोत्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र दुखावल्या गेलेल्या वधूने आणि वधू पक्षाने जुळवून घेण्यास नकार दिला आणि अखेर ते लग्न मोडलं. कोतवाल संजय पांडेय यांच्याकडे फसवणुकीची तक्रारही दाखल करण्यात आली. तपास करून कारवाई केली जाईल, असं पांडेय यांनी सांगितलं.

पुरुषांना कंटाळली, चक्क एलिअनच्या प्रेमात पडली; दुसऱ्या डेटची पाहतेय वाट

अशीच एक घटना महोबामधल्या पनवाडीतल्या एका गेस्ट हाउसमध्येही नुकतीच घडली होती. विवाहाच्या आधी नवऱ्या मुलाचे हावभाव आणि हालचाली विचित्र असल्याचं मुलीच्या लक्षात आलं. तिने त्याला चक्क दोनचा पाढा म्हणायला सांगितलं. वधूने घेतलेल्या या चाचणीत वर नापास झाला आणि वधूने त्याला नाकारलं. वेळीच लक्षात आल्याने एका मुलीचं उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं.

First published: June 23, 2021, 1:14 PM IST

ताज्या बातम्या