जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नाच्या स्टेजवरच लागलं भांडण; नवरदेवाची नवरीला मारहाण, धक्कादायक घटनेचा VIDEO

लग्नाच्या स्टेजवरच लागलं भांडण; नवरदेवाची नवरीला मारहाण, धक्कादायक घटनेचा VIDEO

लग्नाच्या स्टेजवरच लागलं भांडण; नवरदेवाची नवरीला मारहाण, धक्कादायक घटनेचा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव आपल्या नवरीला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरी मिठाई खाण्यासाठी पुढे येत नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : भारतातील लग्न (Indian Wedding) ड्रामा आणि मस्ती याशिवाय अपूर्णच आहेत, असं म्हटलं जातं. अशा अनेक नवरी-नवरदेवाचे व्हिडिओ (Bride and Groom) सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. जवळपास प्रत्येक लग्नात असं काहीतरी नक्की होतं, ज्यामुळे तो दिवसच आयुष्यभर लक्षात राहातो. काही गोष्टी आपल्या आठवणींमध्ये कायम राहतात आणि त्या आठवून नेहमीच हसायला येतं. सोशल मीडियावर सध्या एक असाच अजब वेडिंग व्हिडिओ (Weird Wedding Video) लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

रूसलेल्या नवरीला मनवण्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनी केलं मन जिंकणारं काम, VIDEO प्रत्येक नवरा नवरीची इच्छा असते की आपलं लग्न सर्वात खास, स्मरणात राहील असं आणि इतरांपेक्षा वेगळं असावं. यासाठी अनेकदा लोक असं काही करतात, जे पाहून सगळेच थक्क होतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओदेखील असाच अजब आहे, ज्यात नवरदेवाने लग्नाच्या स्टेजवरच नवरीला मारायला सुरुवात केली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव आपल्या नवरीला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरी मिठाई खाण्यासाठी पुढे येत नाही आणि मिठाई खात नाही. यानंतर नवरदेव मस्करीतच ही मिठाई तिच्या तोंडावर फेकतो आणि मग याचा बदला घेण्यासाठी नवरीदेखील एक मिठाई उचलून नवरदेवाच्या तोंडावर फेकते. नवरीच्या या कृत्यानंतर नवरदेव चांगलाच भडकतो. तो स्टेजवरच सर्वांसमोर नवरीला २-३ चापटी मारतो. यानंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडतो.

सप्तपदीसाठी वाट बघत होता नवरदेव; नवरी भलत्याच कामात मग्न, VIDEO

हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला गेला असून सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 13 लाखहून अधिकांनी पाहिला आहे तर 13 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत आणि यावर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, नवरदेवाने हे अतिशय चुकीचं केलं. दुसऱ्या एकाने लिहिलं, मला वाटतंय हे लग्न जबरदस्ती लावलं जात आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात