जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कार्यालयात फुकटच्या सॅनिटायजरने केली अंगभर मालिश; आजोबांना कोरोना हात पण लावू शकत नाही, Viral Video

कार्यालयात फुकटच्या सॅनिटायजरने केली अंगभर मालिश; आजोबांना कोरोना हात पण लावू शकत नाही, Viral Video

कार्यालयात फुकटच्या सॅनिटायजरने केली अंगभर मालिश; आजोबांना कोरोना हात पण लावू शकत नाही, Viral Video

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोरोनाच्या संकट काळात सोशल मीडियावर सातत्याने नवनवे व्हिडीओ पाहायला मिळत आहे. काही व्हिडीओ पाहून तर तुम्हाला हसू आवरणार नाही. तर काही व्हिडीओ पाहून लोक हैराण होतात. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही म्हणालं..आता बस्स करा..व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक आजोबा सॅनिटायजरचा ज्या पद्धतीनं वापर करीत आहे, ते पाहून कोणीही आपलं डोकं धरेल. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या दिवसात सर्वजणं सॅनिटायजरचा जास्तीत जास्त वापर करीत आहेत. या महासाथीत कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार सॅनिटायजरचा वापर केला जात आहे. व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये आजोबांनी सॅनिटायजरला तेल समजून अंगभर मसाज करीत होते. व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजोबा आपलं डोकं, हात, पाय आणि चेहऱ्यावर सॅनिटायजरने मसाज करीत आहेत.

जाहिरात

हे ही वाचा- जिराफला पानं खाऊ घालत होता मुलगा, अचानक हवेतच उडाला; पाहा Shocking Video लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. लोक हा व्हिडीओ एकमेकांना शेअर करीत असतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करीत त्यांनी मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘इसका कोरोना बाल भी बाका नही कर सकता…पर #मास्क नीचे नहीं करना था चाचा’. हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात