अनेकदा आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. कधी कधी तर मजेत आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी होतात, ज्या आपण विसरू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे. विशेष करुन जेव्हा आपल्या आजूबाजूला प्राणी असतील. प्राण्यांच्या डोक्यात कधी काय येईल, याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ज्यात एका मुलाला जिराफने हवेत उचलल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आपल्या आई-वडिलांसह ज्यूमध्ये एका जिराफासमोर उभा आहे. त्याने एक पान जिराफला खाऊ घालण्यासाठी पुढे केलं. उंच मान असणाऱ्या जिराफने पान तोंडान घेतलं आणि वर घेताना मुलगा हवेत उडाला. तातडीने मुलाच्या आई-बाबांनी त्याला पकडलं. थोळ्या वेळासाठी मुलाचे आई-वडिलही घाबरले होते.
View this post on Instagram
हे ही वाचा-VIDEO - प्राण जाए पर चाय ना जाए! पोलिसापासून स्वतःला नाही, चहाला वाचवण्याची धडपड
मात्र मुलाला खाली खेचल्यानंतर एक महिला हसू लागले. हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला आहे. लोक या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Wild animal