कबूतर पाहिलं एक वेगळाच आनंद मिळतो. आजवर तुम्ही करड्या आणि पांढऱ्या रंगाचे कबूतर पाहिले असतील. पण सोशल मीडियावर एक विचित्र असा कबूतर व्हायरल होतो आहे.
हा कबूतर लांब आहे. त्याच्या मानेकडील भागही फुगीर आहे. आश्चर्य म्हणजे या कबुतराचे पाय पांढरे आहेत आणि त्यावर पिसं दिसत आहेत.
मी पहिल्यांदाच असं कबूतर पाहिलं, याला काय म्हणतात? असा सवाल ट्विटर युझरने या कबुतराचा व्हिडीओ पोस्ट करताना केला आहे.
माहितीनुसार हा पाऊटर पिजन आहे जो इंग्लंडमध्ये आढळतो. तुम्हाला या अनोख्या कबुतराबाबत आणखी काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (सर्व फोटो सौजन्य - ट्विटर)