युनान (चीन), 12 फेब्रुवारी : प्रियकर आणि प्रेयसीतील वादाच्या अनेक घटना समोर येत असतात. लग्नाचे आमिष देऊन प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार केल्याच्याही घटना उघडकीस येत असतात. त्यातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाच्या लग्नात तरुणींच्या जमावाने लग्न मंडपाबाहेर धरणे धरल्याने एकच खळबळ उडाली. मुलींनी तरुणाला आपला एक्स बॉयफ्रेंड असल्याचे सांगत लग्न थांबवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यांचे म्हणणे होते की, या तरुणाने त्यांच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. पण शेवटच्या क्षणी त्याने नकार दिला आणि आता दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे. ही घटना चीनच्या युनान प्रांताचे आहे. या घटनेचा व्हिडिओ चिनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुलींना लग्नमंडपाबाहेर विरोध करताना दाखवण्यात आले आहे. मुलींचा गट बॅनर आणि पोस्टर घेऊन निषेध करत होता. इतकेच नाही तर त्यांच्या एक ब्रॉयफ्रेंड तरुणाला बरबाद करण्याची धमकीही दिली. लग्नात बराच वेळ गदारोळ सुरू होता. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चेन (आडनाव) नावाच्या तरुणाचे 6 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. या लग्नाची सर्व तयारी झाली होती. दरम्यान, मुलींचा एक गट येऊन विवाह मंडपाबाहेर धरणे धरून बसला. त्यांच्या हातात बॅनर होते, ज्यामध्ये लिहिले होते – “आम्ही चेनची एक्स गर्लफ्रेंड आहोत, हे लग्न होऊ शकत नाही. मुलींनी सांगितले की जर हे लग्न झाले तर ते सर्व काही नष्ट करतील.”
फोटो क्रेडिट - सोशल मीडिया
हेही वाचा - दीड वर्ष प्रेमसंबंध, धर्मावरुन तरुणीचा लग्नाला नकार, त्यानं रागाच्या भरात थुंकी चाटायला लावली आंदोलन पाहताच मोठ्या संख्येने लोक तेथे जमा झाले. वधू-वरांच्या कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटले. याबाबत चेनने मीडियाशी बोलताना सांगितले की, या घटनेने त्याला खूप लाज वाटली आहे. त्याची बायकोही निघून गेली आहे तसेच ती बोलतही नाहीये. मात्र, चेनने आपल्या अनेक गर्लफ्रेंड असल्याचे मान्य केले आहे. पण त्या सगळ्यांना तो नाही म्हणाला होता. आता त्याला नवीन आयुष्य सुरू करायचे आहे. सुरुवातीला तो मॅच्युअर नव्हता. त्याच्याकडून चुका झाल्या. मुलींनाही त्रास दिला. पण हा सगळा माझा भूतकाळ होता, असे तो म्हणाला. चेनने त्याच्या भूतकाळातील नातेसंबंधांचे तपशीलवार वर्णन केले नाही. पण त्याने आपल्या एक्स गर्लफ्रेंड्ससोबत जे काही केले, त्याबद्ल त्याला खेद वाटतो.

)







