मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉयफ्रेंडने ब्रेकअप करताच गर्लफ्रेंडने आखला अजब प्लॅन; बदला घेण्यासाठी जे केलं ते जाणून चक्रावून जाल

बॉयफ्रेंडने ब्रेकअप करताच गर्लफ्रेंडने आखला अजब प्लॅन; बदला घेण्यासाठी जे केलं ते जाणून चक्रावून जाल

मुलीचा प्लॅन अतिशय अनोखा होता, पण तिने त्यासाठी खर्च केलेल्या रकमेबद्दल सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले आहेत.

मुलीचा प्लॅन अतिशय अनोखा होता, पण तिने त्यासाठी खर्च केलेल्या रकमेबद्दल सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले आहेत.

मुलीचा प्लॅन अतिशय अनोखा होता, पण तिने त्यासाठी खर्च केलेल्या रकमेबद्दल सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले आहेत.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 22 मार्च : जेव्हा एखादी व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असते तेव्हा ती त्यात पूर्णपणे हरवून जाते, परंतु जेव्हा हे नातं तुटतं आणि सत्य बाहेर येतं तेव्हा ती व्यक्ती एकतर दुःखी होते किंवा बदला घेण्याचा प्लॅन करते. असाच काहीसा प्रकार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Star) अँड्रिया रुसेटसोबत घडला. जेव्हा तिचं ब्रेकअप झालं तेव्हा तिने सतत एक्स बॉयफ्रेंडच्या नजरेत येण्यासाठी आणि त्याचं लक्ष वेधण्यासाठी हजारो रुपये खर्च केले (Girlfriend Spend 75000 to take Revenge on Ex Boyfriend). सर्जरीनंतर रुग्णालयातच अ‍ॅडल्ट मॉडेलचं विचित्र कृत्य; सांगितलं भावुक करणारं कारण मुलीचा प्लॅन अतिशय अनोखा होता, पण तिने त्यासाठी खर्च केलेल्या रकमेबद्दल सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले आहेत. अनेकदा तरुण आणि तरुणी ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर आपला सर्वात ग्लॅमरस अवतार दाखवत असतात. मात्र, अँड्रियाने स्वतःचे फोटो प्रमोट करण्यासाठी पैसे देखील खर्च केले. TikTok वर याबाबत बोलताना तिने सांगितलं की, आपल्या एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तिने एक सेल्फी काढला आणि इंस्टाग्रामवर तो प्रमोट केला. या सेल्फीच्या प्रमोशनसाठी तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या घराच्या आसपासचा परिसर लक्ष्य केला, जेणेकरून त्याला आपल्या एक्स गर्लफ्रेंडचा फोटो सतत दिसत राहील आणि त्याच्या डोक्यात सतत तिचा विचार येईल. त्यानं काय गमावलं हे त्याला समजलं पाहिजे, असा तिचा उद्देश होता. या जाहिरातीसाठी तिला 76 हजार रुपये खर्च करावे लागले. तिचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून आता तिचे 1.5 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

ग्राहकाच्या दरवाजातच डिलीव्हरी बॉयचं कांड; कॅमेऱ्यात कैद झालं संतापजनक कृत्य

अँड्रियाच्या अशा प्रकारे प्रमोशन करण्याच्या कल्पनेचं कौतुक करताना तिच्या फॉलोअर्सनी याला पावर मूव्ह म्हटलं आहे. तर काही लोकांनी हे चुकीचं असल्याचंही म्हटलं. एका यूजरने लिहिलं - माझं रिलेशनशिप तुटल्यानंतर माझ्याही डोक्यात ही कल्पना यायला हवी होती. दुसर्‍या यूजरने लिहिलं - इतक्या पैशात तर मी माझ्या फ्लॅटचं भाडं दिलं असतं. याशिवाय काही वापरकर्त्यांनी सांगितलं की त्यांनाही फीडमध्ये सतत अँड्रियाचे सेल्फी दिसत आहेत.
First published:

Tags: Breakup, Love story

पुढील बातम्या