वॉशिंग्टन, 08 जुलै : 'मी माझं काळीजही तुला काढून देईन', प्रेमात असं म्हणणारे बरेच लोक असतात (Boyfriend girlfrient story). पण एका मुलीने आपल्या प्रेमासाठी काळीज नाही पण आपली किडनी काढून दिली (Breakup story). पण त्यानंतर तिच्या प्रेमानेच तिच्या हृदयावर वार केला. आपल्या शरीरातील अवयव देऊन ज्या बॉयफ्रेंडचा तिने जीव वाचवला तो तिची किडनी घेऊन तिच्या आयुष्यातून निघून गेला (Boyfriend Dumps After Kidney Donation).
कॅलिफोर्नियात राहणारी कोलीन लहानपणापासून तिच्या शेजारी राहत असलेल्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. सुरुवातीला दोघं मित्र होते, हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांत प्रेमात झालं. दोघंही 17 वर्षांचे झाले तेव्हा कोलीनला आपल्या बॉयफ्रेंडला एक गंभीर आजार असल्याचं समजलं. कोलीन त्याच्यावर इतकं प्रेम करत होती की तिने इतक्या कमी वयातही आपल्या शरीरातील अवयव त्याला काढून दिला.
हे वाचा - 'मोठा भाऊ समजून मला माफ कर'; GF ला वैतागलेल्या BF चं Breakup Letter वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही
जेव्हा दोघंही तारुण्याच्या वयावर आले, नातं निभावण्याची खरी वेळ आली तेव्हा कोलीनने त्या दिशेने आपलं एक पाऊल टाकलं. किडनी देण्याच्या तिच्या निर्णयानं त्यांचं नातं अधिक मजबूत होईल असं तिला वाटलं. पण तसं काहीच झालं नाही. उलट ज्याला आपण आपला अवयव देऊन जीव वाचवला तो आपल्यालाच हृदयावरही घाव देईल याचा कोलीनने स्वप्नातही विचार केला नव्हता.
कोलीनने आपली ही ब्रेकअपची स्टोरी एका टीव्ही शोमध्ये सांगितली. किडनी दिल्यानंतर सात महिन्यांतच तिच्या बॉयफ्रेंडने तिला धोका दिला. ठिक झाल्यानंतर त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केलं आणि दुसऱ्या मुलीसोबत त्याने नातं जोडलं.
हे वाचा - Shocking! या पुरुषाला येतात Menstrual Periods; शरीरात ओव्हरीज, गर्भाशय पाहून डॉक्टरही शॉक
कोलीनने सांगितलं की, किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सात महिन्यांनंतर बॉयफ्रेंड लॉस वेगासला गेला होता. तिथं तो बॅचलर ट्रिपवर गेला होता. इतक्या मोठ्या ट्रान्सप्लांटनंतर त्याला थोडा ब्रेक हवा असेल असं मला वाटलं. पण तिथीून परतल्यानंतर त्याने आपण दुसऱ्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. यानंतरही मी त्याला दुसरी संधी दिली. पण त्यानंतर तीन महिन्यांनी त्याने माझ्यासोबत ब्रेकअप केलं आणि तिला सर्व ठिकाणाहून ब्लॉक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.