जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Ex बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचली गर्लफ्रेंड; नव्या नवरीला पाहून चेहराच पडला, पाहा Video

Ex बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचली गर्लफ्रेंड; नव्या नवरीला पाहून चेहराच पडला, पाहा Video

Ex बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचली गर्लफ्रेंड; नव्या नवरीला पाहून चेहराच पडला, पाहा Video

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

Wedding Video Viral: इंटरनेटवर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Wedding Video) पाहायला मिळतात. यातील अनेक व्हिडीओ पाहून इंटरनेट युजर्सही इन्जॉय करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक मुलगी आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचते. यादरम्यान जेव्हा ती नव्या नवरीला पाहते, तर तिला धक्काच बसतो. नवऱ्याला भेटायला आली एक्स गर्लफ्रेंड… व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. मंडपात लग्नाचे विधी सुरू आहेत आणि त्या दोघांना भेटायला पाहुणे येत आहेत. दरम्यान, एक सजलेली मुलगी वधू-वरांना भेटायला येते. त्याच्या हातात एक भेट दिसते. ती हे मोठे गिफ्ट पॅकेट वराकडे घेऊन जाते आणि स्टेजवरून उतरते. यादरम्यान तुम्हाला मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत आहेत.

जाहिरात

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नवरदेवाला गिफ्ट (Wedding Gift) दिल्यानंतर ती स्टेजवरुन खाली उतरते. ती चेहऱ्यावर असा काही भाव आणते, की, नवरीदेखील हैराण होते. नवरी त्या मुलीचं एक्सप्रेशन समजू शकली नाही. नवरी फक्त तिच्याकडे पाहत होती. तिचे हालभाव बघून नवरीला कळालं की, ती नवरदेवाची साधारण मैत्रिण नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे. आपण पाहू शकता की नवरदेवाची मैत्रिण खूप दुःखी दिसत आहे आणि दुःखी चेहरा घेऊनच स्टेजवरुन खाली उतरते. News18 लोकमत या बातमीची पुष्टी करीत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: video , wedding
  • First Published :
जाहिरात
जाहिरात