• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Girlfriend ची सटकली; Breakup नंतर Boyfriend चा सूड उगवण्यासाठी 23 लाखांना लावली आग

Girlfriend ची सटकली; Breakup नंतर Boyfriend चा सूड उगवण्यासाठी 23 लाखांना लावली आग

हा सर्व प्रकार तिच्यावरच उलटला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.

 • Share this:
  रिलेशनशीपमध्ये (Relationship) असताना प्रियकर-प्रेयसी एकमेकांना अनेक गिफ्ट करीत असतात. अनेक ठिकाणी नातं तुटलं तरी दिलेल्या गिफ्ट त्या व्यक्तीची आठवण म्हणून अनेक जणं सांभाळून ठेवतात. मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीने प्रियकराला 1 लाख बहत (Baht) म्हणजेच 23 लाख रुपयांची Triumph बाइक गिफ्ट म्हणून दिली होती. मात्र त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर त्या तरुणीने सूड उगवण्यासाठी धक्कादायक प्रकार केला आहे. सीसीटीवी फुटेजनुसार, कनोक वान (Kanok Wan) पहिल्यांदा हातात पेट्रोलची कॅन घेऊन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बाइकच्या दिशेने जाते आणि बाइकवर पेट्रोल ओतते. त्यानंतर ती काडीपेटीने चक्क बाइक जाळून टाकते. हे केल्यानंतर ती तेथून निघून जाते आणि बाहेर उभ्या असलेल्या कारमधून निघून जाते. LadBible च्या रिपोर्टनुसार, तरुणीचं सूड उगवणं तिच्यावरच भारी पडलं. कारण अग्निशमन दलाच्या येण्यापूर्वी या बाइकशेजारी असलेल्या आणखी सहा गाड्यांनाही आग लागली. सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नाही. थोंगलोरचे पोलीस अधिकारी मोंगकुट थानोमजई यांनी LADbible च्या हवाल्याने सांगितलं की, आम्हाला श्रीनाखरिनविरोट विश्वविद्यालय प्रसारमित प्रदर्शन स्कूल (Srinakharinwirot University Prasarnmit Demonstration School) मध्ये पार्किंग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची सूचना मिळाली होती. हे ही वाचा-भारदस्त व्यक्तिमत्व, करारी नजर आणि...;सोशल मीडियावर 'सिलिंडर मॅन'ची जोरदार चर्चा ही इमारत शाळेच्या प्राथमिक वर्गांच्या विंगशी जोडलेली होती. सुदैवाने या प्रकारात कोणीही जखमी झालं नाही. महासाथीमुळे सर्व विद्यार्थी ऑनलाइन वर्ग सुरू असल्याने मोठा अपघात टळला. सीसीटीवी फुटेजच्या आधारावर पोलिसांनी कनोक वान (Kanok Wan) यांची माहिती मिळवली आहे. ती शाळेतील एका कर्मचाऱ्याची एक्स गर्लफ्रेंड आहे. वानला पोलिसांनी अटक केली आहे. पार्किंगमध्ये ज्यांच्या गाड्या होत्या, त्यांच नुकसान केल्याप्रकरणी तिची चौकशी सुरू आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: