जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रेस्टॉरंटमध्ये मुलीला प्रियकरासोबत पकडलं त्यानंतर धू धू धूतलं, Video तुफान व्हायरल

रेस्टॉरंटमध्ये मुलीला प्रियकरासोबत पकडलं त्यानंतर धू धू धूतलं, Video तुफान व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

काही दिवसांपूर्वीच ‘व्हॅलेंटाईन डे’ झाला. या दिवशी सर्वत्र प्रेममय वातावरण पहायला मिळालं. अनेकांनी आपल्या मनातील भावना आपल्या प्रियजनांशी शेअर केल्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वीच ‘व्हॅलेंटाईन डे’ झाला. या दिवशी सर्वत्र प्रेममय वातावरण पहायला मिळालं. अनेकांनी आपल्या मनातील भावना आपल्या प्रियजनांशी शेअर केल्या. त्यांना छान छान गिफ्ट देत त्यांच्यासोबत वेळ घालवला. मात्र काही ठिकाणी प्रेमावरुन अनेक राडे पहायला मिळाले. अनेकांचे ब्रेकअप झाले तर काहींना घरच्यांनी रंगहाथ पकडले. याचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकराना चांगलाच चोप दिल्याचं समोर आलं आहे. खरंतर व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक मुलगी गुपचूप तिच्या बॉयफ्रेंडसोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली. तिथे जेवणाच्या टेबलावर बसून ते प्रेमाविषयी बोलत होते. पण मुलीच्या आईला याचा सुगावा लागला आणि ती थेट रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. यानंतर तिने आधी मुलीच्या प्रियकराला चापट मारली आणि नंतर मुलीला शिवीगाळ केली. प्रियकराला मारहाण होत असल्याचे पाहून मुलगी समोर येताच आईने तिच्यावरही चप्पलांचा वर्षाव सुरू केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात

@gharkekalesh या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंटदेखील येत आहेत. अवघ्या 22 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, ‘व्हॅलेंटाईन डे’ असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यामध्ये प्रेमयुगुलाला मार खावा लागला किंवा भांडणाचा सामना करावा लागला. प्रेमाच्या दिवशीच प्रेमींना चोप बसल्याचं पहायला मिळालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात