डेहराडून, 29 जुलै : शाळा म्हटलं की शाळेत मुलांचा गोंगाट ऐकू येतोच. पण सध्या अशा एका शाळेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्या शाळेत विद्यार्थिनींचा किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज येतो आहे. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थिनी जमिनीवर लोळण घेत, डोकंही आपटू लागल्यात. असे एक ना दोन किती तरी विद्यार्थिनी विचित्र वागू लागल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक, पालक सर्वजण घाबरले आहे. या विद्यार्थ्यांना नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न उद्भवत आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील रायखोली गावातील एका सरकारी शाळेतील ही घटना. जिथं काही विद्यार्थी अचानक विचित्र वागू लागले. विद्यार्थ्यांना पाहून शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारीही भयभीत झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांत कऱण्याचा प्रयत्न केला, ते असं का करत आहेत हे विचारलं. पण ना विद्यार्थी शांत होत होते आणि कारण सांगत होतं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता शाळेच्या आवारात मैदानात विद्यार्थी जमिनीवर बसले आहेत. कुणी मोठ्याने ओरडतं आहे, किंचाळतं आहे. कुणी ढसाढसा रडतं आहे, कुणी रडत जमिनीवर लोळण घेतं आहे. शिक्षक या विद्यार्थ्यांना शांत कऱण्याचा प्रयत्न करत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी न्यूज 18 ची टीम या गावात पोहोचली. हे वाचा - VIDEO - विद्यार्थ्यांना भरपाण्यात उभं करून स्वतःसाठी बनवायला लावला पूल; शिक्षिकेचं संतापजनक कृत्य शाळेतील शिक्षिका विमला देवी म्हणाल्या, “सर्वात आधी मंगळवारी काही विद्यार्थीनी अशा विचित्र वागू लागल्या. त्यानंतर एक विद्यार्थीही असाच वागू लागला. ते रडत होते, किंचाळत होते, थरथऱ कापत होते. काही कारण नसताना स्वतःचं डोकं आपटत होते. आम्ही त्यांच्या पालकांना बोलावलं. त्यांनी एका स्थानिक पुजाऱ्याला बोलावलं आणि परिस््थिती नियंत्रणात आली. पण गुरुवारी पुन्हा तशीच परिस्थिती होती” “शाळेत काहीतरी वाईट असल्याचं सांगत पालक आम्हाला शाळेत पूजा करायला सांगत आहेत. परिस्थिती सामान्य व्हावी यासाठी आम्ही सर्वकाही करत आहोत. डॉक्टरांपासून, पुजारी, बाबाबुवा सर्वांची मदत घेत आहोत”, असं त्या म्हणाल्या.
Few students in a govt school in Bageshwar dist of #Uttarakhand on Wednesday suddenly started screaming and shouting. Some beleieve it's a "mass hysteria" phenomenon. A team of doctors will visit school today. pic.twitter.com/htsFjrcC0Y
— Anupam Trivedi (@AnupamTrivedi26) July 28, 2022
मुलांना नेमका कसला त्रास होतो आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण कोमल रावत नावाच्या एका विद्यार्थीनाने अंधार असलेले वर्ग भय निर्माण करत असावेत, असं म्हटलं आहे. पालकांच्या मते, ही भूतबाधा असावी तर तज्ज्ञांनी ही मास हिस्टिरिया असल्याची शक्यता वर्तवली आहे. हे वाचा - विद्यार्थ्याकडून मसाज करून घेतानाचा शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल, शिक्षिकेवर बडतर्फीची कारवाई मास्ट हिस्टिरिया अशी समस्या आहे, जेव्हा एका गटातील लोक अचानक विचित्र वागू लागतात. त्यांच्यात एकसारखीच आजाराची लक्षणं किंवा भावना दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, मास्क हिस्टिरिया ही एक मानसिक समस्या आहे. मानसिक तणावामुळे याची शारीरिक लक्षणं दिसून येतात. डून मेडिकल कॉलेजमधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जया नवानी म्हणाल्या, “मास हिस्टिरियाची अशी प्रकरणं विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला घडत असलेल्या घडामोडींशी थेट संबंधित आहेत. जसं की डोंगराळ भागात फेथ हिलिंग सामान्य आहे. दैनंदिन जीवनात याचा अनुभव घेणाऱ्या मुलांच्या मेंदूवर याचा परिणाम होतो” बागेश्वर जिल्हा पंचायत समितीचे सदस्य चंदन रावत यांनाही हे मास हिस्टिरायचंच प्रकरण वाटतं आहे. जिल्ह्यातील इतर काही शाळांमध्येही अशाच घटना याआधी घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. डेहराडूनमधील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी मुकुल सती यांनी सांगितलं, “बागेश्वरमधील ही घटना एकमेव नाही. आम्हाला चक्राता आणि उत्कर्षी इथल्या शाळांमधूनही अशीच प्रकरणं आली आहेत. त्यामुळे आम्ही एक वैद्यकीय पथक राज्यातील सरकारी शाळांमध्ये पाठवणार आहोत आणि मुलांमध्ये नेमकी कसली भीती आहे, ती कशी दूर करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत”