मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रियकराचं अजब कृत्य पाहून शॉक झाली तरुणी; बॉयफ्रेंड सोडून त्याच्या मित्रालाच करू लागली डेट

प्रियकराचं अजब कृत्य पाहून शॉक झाली तरुणी; बॉयफ्रेंड सोडून त्याच्या मित्रालाच करू लागली डेट

व्हिडिओमध्ये पॅगी सांगते की पहिल्याच डेटवेळी तिच्या प्रियकराने तिच्यासोबत काय केलं

व्हिडिओमध्ये पॅगी सांगते की पहिल्याच डेटवेळी तिच्या प्रियकराने तिच्यासोबत काय केलं

व्हिडिओमध्ये पॅगी सांगते की पहिल्याच डेटवेळी तिच्या प्रियकराने तिच्यासोबत काय केलं

नवी दिल्ली 03 डिसेंबर : टिकटॉकवर सध्या एका तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Tiktok Video Viral) होत आहे. 28 वर्षीय पॅगी बायरन हिने आपल्या टिकटॉक अकाऊंट @paigebryanofficial वर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये पॅगी सांगते की पहिल्याच डेटवेळी तिच्या प्रियकराने तिच्यासोबत काय केलं (Weird Dating Experience). प्रेयसी पॅगी हिच्यासोबत पहिल्यांदा डेटवर जाताना तिचा बॉयफ्रेंड आपल्यासोबत तब्बल चार मित्र घेऊन गेला. हे पाहून पॅगीही हैराण झाली.

पॅगीला काहीही समजत नव्हतं. मात्र जेव्हा हे संपूर्ण प्रकरण तला समजलं तेव्हा ही प्रेमकथा सुरू होण्याआधीच संपलेली होती. पॅगीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या बॉयफ्रेंडचा तिने यात उल्लेख केला आहे, त्याला ती एका क्लबमध्ये भेटली होती. हा तरुण अतिशय सुंदर होता.

क्लबमधील भेटीनंतरच दोघांनीही एकमेकांना आपले फोन नंबर दिले. मात्र त्यादिवशी क्लबमध्ये त्यांचं जास्त बोलणं झालं नाही. मात्र या छोट्याशा भेटीतच पॅगी या तरुणाच्या प्रेमात पडली. यानंतर दोघांचं मोबाईलवर बराच वेळ बोलणं होत असे. काही दिवसानंतर दोघांनीही डिनर डेटवर जायचं ठरवलं आणि भेटण्यासाठी जागाही ठरवली. पॅगीने सांगितलं की मी त्याला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते त्यामुळे ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळी तिथे हजर झाले.

पॅगीने पुढे म्हटलं, मी डिनर टेबलवर बसून त्याची वाट पाहत होते. काहीच वेळात तो तिथे आला. मात्र त्याच्यासोबत त्याचे चार मित्र होते. मात्र पहिल्याच डेटसाठी हा मुलगा आपल्या चार मित्रांना सोबत घेऊन का आला, असा प्रश्न तिला पडला. हा मला एकटाच भेटायला येणार होता, मग याने असं का केलं असे सवाल पॅगीला पडले. तिथे येताच त्याने पॅगीची गळाभेट घेतली. पॅगीचं कौतुक करत त्याने ती सुंदर दिसत असल्याचं म्हटलं. यानंतर त्याने आपल्यासोबतच्या चार मित्रांची पॅगीसोबत ओळख करून दिली.

पॅगीने सांगितलं की बॉयफ्रेंडचं हे कृत्य तिला अतिशय विचित्र वाटलं. ती तिथून निघून जाणारच होती इतक्यात तिची नजर तिथे आलेल्या चार मित्रांपैकी एकावर पजली. पॅगीला तो आवडला. यानंतर तिने या अनोळखी व्यक्तीसोबतच मैत्री केली आणि त्याला डेट करण्यास सुरुवात केली. यानंतर पॅगीने आपल्या पहिल्या बॉयफ्रेंडला भेटणंही बंद केलं आणि त्याच्याच मित्रासोबत तिनं आपलं नातं पुढे नेलं.

First published:

Tags: Love story, Online dating