Home /News /viral /

मुलीची हुशारी बघून सगळेच झाले चकीत, क्षणात सोडवलं अवघड कोडं; पाहा VIDEO

मुलीची हुशारी बघून सगळेच झाले चकीत, क्षणात सोडवलं अवघड कोडं; पाहा VIDEO

मुलीने कागद दुमडला, त्यावर पेन ठेवलं, एक रेष काढली, घडी सरळ केली आणि चॅलेंज पूर्ण झालं. वयाच्या मानाने मुलीनं दाखवलेली हुशारी पाहून सगळेच अवाक झाले.

  नवी दिल्ली, 7 डिसेंबर: एका मुलीनं तिच्या वयासाठी (Girl solved puzzle) अतिशय कठीण असणारं कोडं एका क्षणात सोडवलं आणि तिच्या बुद्धीचं (Intelligent girl) सर्वांनाच कौतुक वाटलं. अनेकदा अभ्यास करताना अशा काही गोष्टी शिकवल्या जातात की त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा (Intellect and talent) आणि विचारांच्या क्षमतेचा कस लागतो. केवळ पुस्तकी पाठांतर करण्याऐवजी मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेचा चालना देणारी अनेक कोडी शिक्षक त्यांना विचारत असतात. त्यावर मुलं आपापल्या परीनं ती सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही मुलं इतकी हुशार असतात की त्यांना पटकन त्या कोड्याचं उत्तर सुचतं आणि आपल्या हुशारीनं ती सर्वांचं लक्ष वेधून घेतात. अशाच एका हुशार मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  मुलीचं लढवली शक्कल या व्हिडिओत एक व्यक्ती तीन मुलींना एक कोडं देतो. व्यक्तीसमोर तीन शाळकरी मुली बसल्या आहेत. व्हिडिओतील व्यक्ती त्यांना एक चॅलेंज देते. कागदावर एक टिंब काढून त्याच्या भोवती वर्तुळ काढण्याचं चॅलेंज ती व्यक्ती देते. मात्र असं करताना कागदावर एक पेन टेकवलं की ते पुन्हा न उचलण्याची अट घालण्यात येते. मग या व्हिडिओत दिसणाऱ्या तीन मुली आपापल्या परीनं ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. तिसरी मुलगी हुशार या व्हिडिओत दिसणारी पहिली मुलगी पेनाने डॉट काढते, मात्र ते उचलता सर्कल काढताना तिच्याकडन रेष ओढली जाते. दुसरी मुलगी वर्तुळ काढण्याऐवजी चौकोन काढते, तर तिसरी मुलगी मात्र कागद कोपऱ्यात दुमडून त्यावर टिंब उमटवते आणि नंतर त्याची घडी काढून सर्कल पूर्ण करते. हे वाचा-  ख्रिसमसदिवशी असं काही घडेल की संपूर्ण जग हादरेल; टाइम ट्रॅव्हलरचा धक्कादायक दावा व्हिडिओ होतोय व्हायरल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहे. विद्यार्थ्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसीत होण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आणि स्तुत्य असल्याचं युजर्स सांगतात. तर ही मुलगी भविष्यात आईनस्टाईन बनू शकते, असे कौतुकाचे शब्द अनेकांनी काढले आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Brain, Small girl, Viral video.

  पुढील बातम्या